‘आधार’चा डेटाबेस सुरक्षित

पीटीआय
रविवार, 25 मार्च 2018

नवी दिल्ली - आधारचा डेटाबेस संपूर्णपणे सुरक्षित असून कोणत्याही प्रकारचा डेटा लिक झालेला नसल्याचे आज आधार (यूआयडीएआय)ने स्पष्ट केले आहे. एका तंत्रज्ञानविषयक संकेतस्थळाने सुरक्षा संशोधकाच्या आधारे आधारधारकांची माहिती लिक झाल्याचा दावा केला आहे. एक सरकारी कंपनी आधारकार्ड धारकांशी निगडित असलेली माहिती सार्वजनिक करत असल्याचा गौप्यस्फोट संकेतस्थळावर केला. मात्र ‘आधार’ने हे वृत्त बिनबुडाचे असून डेटाबेस सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ‘यूआयडीएआय’ संबंधित पोर्टलविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचादेखील विचार करत असल्याचे म्हटले आहे.

Web Title: business news aadhar card database is protected