तेजी वाढता वाढता वाढे 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

मुंबई - बॅंकिंग क्षेत्रातील थेट परकी गुंतवणुकीची मर्यादा वाढविण्याच्या वृत्ताने उत्साहित झालेल्या गुंतवणूकदारांनी गुरुवारी (ता. १८) बॅंकिंग शेअर्सची जोरदार खरेदी केली. यामुळे सेन्सेक्‍स आणि निफ्टीतील तेजीला बळ मिळाले. दिवसअखेर सेन्सेक्‍सने १७८.४७ अंशांच्या वाढीसह ३५,२६० अंशांवर बंद झाला. निफ्टीने २८.४५ अंशांची वाढ नोंदवीत १०,८१७ अंशांपर्यंत मजल मारली आहे. दोन्ही निर्देशांकांनी आज पुन्हा नवा उच्चांक नोंदविला आहे. 

खासगी बॅंकांमधील थेट परकी गुंतवणूक १०० टक्‍क्‍यांपर्यंत आणि सार्वजनिक बॅंकांमधील परकी गुंतवणूक ४९ टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्याचा सरकार विचार करत आहे. त्याचा परिणाम बॅंकांच्या शेअर्सवर दिसून आला. बॅंकिंग काउंटरवर खरेदीसाठी झुंबड उडाली होती. यात एचडीएफसी बॅंक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंक, कोटक बॅंक आदी शेअर्स वधारले. एसबीआयच्या शेअर मात्र नफेखोरीची झळ बसली. सेन्सेक्‍स मंचावर महत्त्वाच्या बॅंकिंग शेअर व्यतिरिक्‍त आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, टीसीएस, बजाज ऑटो, विप्रो आदी शेअर तेजीसह बंद झाले. रियल्टी, मेटल, इन्फ्रास्ट्रक्‍चर, पॉवर, पीएसयू आदी क्षेत्रांत अखेरच्या तासात नफेखोरी झाल्याने सेन्सेक्‍सची घोडदौडीला ब्रेक लागला.

अवघ्या १७ सत्रांमध्ये सेन्सेक्‍सने ३४ हजारांवरून ३५ हजारांची झेप घेतली. या कालावधीत गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत तीन लाख कोटींची भर पडली आहे.

Web Title: business news banking