“भारत-22″ ईटीएफ लवकरच खुला होणार

पीटीआय
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

मुंबई: प्रमुख औद्योगिक क्षेत्रांमधील 22 महत्वाच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करणारा "भारत-22" ईटीएफ बाजारात एंट्री घेण्यास सज्ज झाला आहे. लवकरच केंद्र सरकारकडून भारत-22ची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या योजनेतून जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करून निर्गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य करण्याचा सरकारचा प्रमुख उद्देश आहे.

मुंबई: प्रमुख औद्योगिक क्षेत्रांमधील 22 महत्वाच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करणारा "भारत-22" ईटीएफ बाजारात एंट्री घेण्यास सज्ज झाला आहे. लवकरच केंद्र सरकारकडून भारत-22ची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या योजनेतून जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करून निर्गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य करण्याचा सरकारचा प्रमुख उद्देश आहे.

"भारत-22" या ईटीएफचे आयसीआयसीआय प्रुडेंशिअल असेट मॅनेजमेंट कंपनीकडून व्यवस्थापन केले जाणार आहे. "भारत-22" मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. त्याशिवाय युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाने हमी घेतलेल्या ऍक्‍सिस बॅंक, एलअँडटी, आयटीसी या कंपन्यांचा समावेश आहे. ईटीएफमध्ये प्राप्त झालेला निधी निर्धारित केलेल्या 22 शेअर्समध्ये गुंतवला जाईल. ईटीएफसाठी मुंबई शेअर बाजारातील भारत-22 निर्देशांक हा बेंचमार्क असून गेल्याच महिन्यात तो सुरू झाला आहे. भारत-22 ईटीएफ ही किमान जोखीम आणि चांगला परतावा देणारी योजना आहे. या योजनेतील गुंतवणुकीबाबत सखोल अभ्यास आणि संशोधन करण्यात आल्याचे आयसीआयसीआय प्रुडेंशिअल एएमसीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी एस. नरेन यांनी सांगितले. भारत-22 मध्ये उद्योग, ऊर्जा, युटीलीटीज, वित्त, एफएमसीजी आणि बेसिक मटेरिअल्स या सहा क्षेत्रात नियोजनबद्ध गुंतवणूक केली जाणार आहे. लाजकॅपला प्राधान्य असून मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही काही प्रमाणात गुंतवणूक केली जाईल, असे त्यांनी सांगितले. भारत-22 ही किमान खर्च असलेली ही एक योजना असेल, असा विश्‍वास नरेन यांनी व्यक्त केला.

बीएसई भारत-22 निर्देशांकाने सेन्सेक्‍सच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे. केंद्र सरकारच्या वित्तीय समावेशन, डिजिटल आणि कॅशलेस इकॉनॉमी, जीएसटी आणि पायाभूत सेवांमधील सुधारणांमुळे "भारत-22" ईटीएफमधील कंपन्यांच्या कामगिरीमध्ये सुधारणा होईल. सध्या बहुतांश शेअर्स आकर्षक किंमतींवर आहेत. भारत-22 च्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल, असे आयसीआयसीआय प्रुडेंशिअलचे फंड व्यवस्थापक चिंतन हरिया यांनी सांगितले.

Web Title: business news bharat-22 ETF