सर्व क्षेत्रांत रोजगार सुरक्षा

पीटीआय
बुधवार, 21 मार्च 2018

नवी दिल्ली - व्यवसायपूरक वातावरण वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रत्येक क्षेत्रात निश्‍चित कालावधीसाठी कामगार भरती करण्यास परवानगी दिली. याआधी ही परवानगी केवळ वस्त्रोद्योग क्षेत्रात होती. 

नवी दिल्ली - व्यवसायपूरक वातावरण वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रत्येक क्षेत्रात निश्‍चित कालावधीसाठी कामगार भरती करण्यास परवानगी दिली. याआधी ही परवानगी केवळ वस्त्रोद्योग क्षेत्रात होती. 

आता प्रत्येक क्षेत्रात एखाद्या विशेष कामासाठी अथवा ‘ऑर्डर’साठी निश्‍चित कालावधीसाठी कामगारांची भरती करता येईल. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याविषयी अर्थसंकल्पात घोषणा केली होती. सर्वच क्षेत्रांत निश्‍चित कालावधीसाठी कामगार भरती करण्याची सुविधा देण्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. वस्त्रोद्योग क्षेत्रात निश्‍चित कालावधीसाठी कामगार भरती करण्याचे धोरण २०१६ मध्ये लागू झाले. याबाबत कामगार मंत्रालयाने सुधारित अधिसूचना काढली आहे. त्यात म्हटले आहे, की वस्त्रोद्योग क्षेत्रात निश्‍चित कालावधीसाठी कामगारभरती याऐवजी आता सर्वच क्षेत्रांत हे लागू होईल. 

Web Title: business news Employment security in all areas