पुढील आर्थिक वर्षात ‘जीडीपी’ ७.३ टक्के 

पीटीआय
गुरुवार, 15 मार्च 2018

नवी दिल्ली - भारताचे एकूण देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) पुढील आर्थिक वर्षात ७.३ टक्‍क्‍यांवर जाईल आणि त्यापुढील आर्थिक वर्षात २०१९-२० मध्ये ते ७.५ टक्‍क्‍यांवर पोचेल, असा अंदाज जागतिक बॅंकेने बुधवारी व्यक्त केला. 

जागतिक बॅंकेने ‘इंडिया डेव्हलपमेंट अपडेट : इंडियाज ग्रोथ स्टोरी’ हा द्वैवार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ६.७ टक्के राहील. भारताने ८ टक्के विकास दर गाठावयाचा झाल्यास सुधारणांमध्ये सातत्य आणि त्यांचे प्रमाण वाढवणे आवश्‍यक आहे. याचवेळी कर्ज आणि गुंतवणुकीशी निगडित प्रश्‍न सोडवून निर्यातीसाठी स्पर्धात्मकता वाढविण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. नोटाबंदी आणि वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) परिणामांतून भारतीय अर्थव्यवस्था सावरली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेची वाढ स्थिर गतीने होईल. 

Web Title: business news GDP