सोन्याला झळाळी

वृत्तसंस्था
रविवार, 25 मार्च 2018

नवी दिल्ली - सोन्याच्या भावात शनिवारी प्रतिदहा ग्रॅम ८५ रुपयांची वाढ होऊन तो ३१ हजार ८३५ रुपयांवर पोचला. जागतिक पातळीवर भावात आलेली तेजी आणि स्थानिक सराफांकडून वाढलेली खरेदी यामुळे सोन्याला झळाळी आली. औद्योगिक क्षेत्र आणि नाणी तयार करणाऱ्यांकडून मागणी वाढल्याने चांदीच्या भावातही प्रतिकिलो ५० रुपयांची वाढ होऊन तो ३९ हजार ६०० रुपयांवर पोचला. 

अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध होण्याच्या भीतीने डॉलरमध्ये घसरण होत आहे. यामुळे सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे गुंतवणूकदारांचा रोख वळला आहे. जागतिक पातळीवर सोन्याच्या भावात प्रतिऔंस १.३७ डॉलरची वाढ होऊन ते १ हजार ३४६ डॉलरवर पोचले. चांदीचा भावही प्रतिऔंस १६.५३ डॉलरवर पोचला. दिल्लीतील बाजारपेठेत सोन्याचा भाव आज एक महिन्यातील उच्चांकी पातळीवर पोचला. शुद्ध सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅम ८५ रुपयांनी वाढून ३१ हजार ८३५ रुपयांवर पोचला. स्टॅंडर्ड सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅम ८५ रुपयांनी वाढून ३१ हजार ६८५ रुपयांवर पोचला. याआधी २७ फेब्रुवारीला सोन्याचा भाव उच्चांकी पातळीवर पोचला होता. 

भाववाढीची कारणे 
व्यापार युद्धाच्या भीतीने डॉलरमध्ये घसरण 
डॉलरमधील घसरणीमुळे मागणीत वाढ 
सराफांकडून खरेदीचा वाढलेला जोर 

दिल्लीतील भाव  (प्रति १० ग्रॅम) (रुपयांत)
सोने   - ३१,८३५ (+८५) 

चांदी - ३९,६०० (+५०)

Web Title: business news gold