दिवसभरात ५० उड्डाणे इंडिगो, गोएअरकडून रद्द

पीटीआय
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई - इंडिगो आणि एअर इंडियाकडील एक तृतीयांश ‘ए३२० निओ’ विमाने बुधवारी हवेत झेपावली नाहीत. यामुळे या दोन्ही कंपन्यांनी सुमारे ५० उड्डाणे आज रद्द केली. 

मुंबई - इंडिगो आणि एअर इंडियाकडील एक तृतीयांश ‘ए३२० निओ’ विमाने बुधवारी हवेत झेपावली नाहीत. यामुळे या दोन्ही कंपन्यांनी सुमारे ५० उड्डाणे आज रद्द केली. 
नागरी हवाई वाहतूक महासंचलनालयाने (डीजीसीए) सुरक्षेच्या कारणास्तव ‘ए३२० निओ’ विमानांच्या उड्डाणांबाबत चिंता व्यक्त केली आहे. यामुळे इंडिगोने आज ४२ विमान उड्डाणे रद्द केली. तसेच, गोएअरने १४ ते २४ मार्च या कालावधीतील १८ उड्डाणे रद्द केली. इंडिगोकडून दररोज सरासरी एक हजार, तर गोएअरकडून दररोज सरासरी २३० उड्डाणे होतात. ‘पी अँड डब्ल्यू’ इंजिन बसविलेली ‘ए३२० निओ’ ही ४५ विमाने देशात असून, ती इंडिगो आणि गोएअरकडे आहेत. ‘पी अँड डब्ल्यू’ इंजिन असलेली विमाने उड्डाण केल्यानंतर हवेतच बंद पडत असल्याची सुरक्षाविषयक भीती ‘डीजीसीए’ने काल व्यक्त केली होती. यामुळे काल (ता. १३) इंडिगोने ६५, तर गोएअरने ४७ उड्डाणे रद्द केली होती.

Web Title: business news Indigo airindia