गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महिंद्राकडून सवलती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

पुणे - गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवी चारचाकी मोटार घेणाऱ्या ग्राहकांसाठी महिंद्राने गुणवत्तापूर्ण वाहनांचे चांगले पर्याय सवलतीत उपलब्ध करून दिले आहेत. वाहन उद्योगात वेगळेपण जपताना कंपनीने ग्राहकांशी असलेली बांधिलकी सातत्याने घट्ट केली आहे. 

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महिंद्राची वाहन खरेदी ग्राहकांसाठी आनंददायी ठरणार आहे. स्वयंचलित वाहननिर्मितीत महिंद्रा अग्रेसर आहे. महिंद्राच्या युटिलिटी व्हेईकल चारचाकी वाहनांच्या श्रेणीत सर्वोत्तम मानल्या जातात. त्यातही स्कॉर्पिओ, बोलेरो, बोलेरो पॉवर प्लस, झायलो, केयूव्ही १०० एनक्‍सटी, एक्‍सयूव्ही ५००, टीयूव्ही ३०० ही वाहनांना ग्राहकांकडून मागणी आहे. ग्राहकांसाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महिंद्राने मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत. यामध्ये बोलेरोवर ३८ हजार, बोलेरो पॉवर प्लसवर २७ हजार, स्कॉर्पिओवर ६५ हजार, केयूव्ही १०० एनएक्‍सटीवर ७० हजार, टीयूव्ही ३०० वर ६५ हजार, एक्‍सयूव्ही ५०० वर ५७५०० रुपये सवलत देण्यात आली आहे. आकर्षक लूक, रंगसंगती, आरामदायी बैठक व्यवस्था, अत्याधुनिक सोईसुविधा, अधिकाधिक मायलेज या गोष्टींमुळे महिंद्राच्या युटिलिटी व्हेईकलला ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.

Web Title: business news mahindra gudhipadwa

टॅग्स