‘फायरस्टार’ची दिवाळखोरी रोखण्याचा सरकारचा प्रयत्न

वृत्तसंस्था
सोमवार, 26 मार्च 2018

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहारातील मुख्य 
आरोपी नीरव मोदी याच्या फायरस्टार डायमंडने अमेरिकेतील न्यायालयात दिवाळीखोरीसाठी अर्ज केला असून, ही प्रक्रिया रोखण्यासाठी केंद्र सरकार कायदेशीर पर्याय शोधत आहे.

‘पीएनबी’मधील सुमारे १३ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारानंतर फायरस्टार डायमंडने अमेरिकेतील न्यायालयात दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने या गैरव्यवहाराशी निगडित व्यक्ती आणि संस्था अशा ६० जणांना मालमत्ता विक्रीस मनाई केली आहे. यामधील एका कंपनीची फायरस्टार डायमंड ही उपकंपनी आहे. 

‘पीएनबी’ही आव्हान देणार 
‘पीएनबी’ही फायरस्टार डायमंडच्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेत वादी म्हणून सहभागी होण्याचा विचार करत आहे. नीरव मोदी याच्याकडून कर्जवसुली करण्यासाठी ‘पीएनबी’ सर्व पर्याय शोधत आहे. याचाच भाग म्हणून दिवाळखोरी प्रक्रियेला रोखण्याचा प्रयत्न करण्याचे पाऊल उचलण्याच्या तयारीत बॅंक आहे.

Web Title: business news PNB case