स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून ४१ लाख बचत खाती बंद

पीटीआय
बुधवार, 14 मार्च 2018

इंदूर - चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारी या कालावधीत सरासरी मासिक शिल्लक कायम न ठेवल्याप्रकरणी ४१.१६ लाख बचत खाती स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) बंद केली आहेत. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे. ‘एसबीआय’ने आजच बचत खात्यावर सरासरी मासिक शिल्लक न ठेवल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडात कपात केली. 

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ‘एसबीआय’ने बचत खात्यावर सरासरी मासिक शिल्लक न ठेवल्यास दंड आकारणे सुरू केले होते. पाच वर्षांच्या खंडानंतर ‘एसबीआय’ने हा दंड आकारण्यास सुरवात केली होती. गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये बॅंकेने हा दंड काही प्रमाणात कमी केला. याबाबत माहिती अधिकारात बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जानेवारी या कालावधी बॅंकेने सरासरी मासिक शिल्लक न ठेवणारी ४१.१६ लाख बचत खाती बंद केली आहेत.

Web Title: business news SBI bank

टॅग्स