सेन्सेक्‍समध्ये सलग आठव्या सत्रात तेजी 

सेन्सेक्‍समध्ये सलग आठव्या सत्रात तेजी 

मुंबई - स्थानिक आणि परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीच्या जोरावर सेन्सेक्‍स सलग आठव्या सत्रात वधारला. सोमवारी (ता.२७) निर्देशांकात ४५ अंशांची भर पडली आणि तो ३३ हजार ७२४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ९.८५ अंशांची वाढ झाली आणि निफ्टी १० हजार ३९९ अंशांवर बंद झाला. 

ऊर्जा, बांधकाम, पायाभूत सेवा सुविधा, ग्राहकोपयोगी वस्तू आणि भांडवली वस्तू उत्पादक  कंपन्यांच्या शेअर्सला मागणी दिसून आली. एनटीपीसीमध्ये सर्वाधिक वधारला. त्याखालोखाल ॲक्‍सिस बॅंक, ओएनजीसी, एसबीआय, विप्रो, एलअँडटी आदी शेअरमध्ये वाढ झाली. मानांकन सुधारल्यानंतर अर्थव्यवस्थेत सकारात्मक वातावरण झाले आहे. दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची कामगिरी बहरेल, असा गुंतवणूकदारांना विश्‍वास असल्याने खरेदीचा ओघ कायम असल्याचे जिओजित फायन्शिअल सर्व्हिसचे मुख्य विश्‍लेषक विनोद नायर यांनी सांगितले. जून २०१५ नंतर पहिल्यांदाच सलग आठ सत्रांमध्ये निर्देशांकात वाढ झाली. गेल्या सात सत्रांमध्ये सेन्सेक्‍सने ९१८.८० अंशांची कमाई केली. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी ४२७ कोटींची खरेदी केली. खनिज तेल उत्पादक देशांची बैठक या आठवड्यात होणार आहे. त्याचबरोबर वायदेपूर्ती असल्याने बाजाराची पुढील दिशा या दोन घडामोडींवर ठरेल, असा अंदाज शेअर दलालांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com