सेन्सेक्‍स, निफ्टीचा पुन्हा उच्चांक

पीटीआय
गुरुवार, 18 जानेवारी 2018

मुंबई - रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी यांची पश्‍चिम बंगालमध्ये पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा, तसेच इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे भारत दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्यादरम्यान होणारे करार या सर्वांचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर होऊन सेन्सेक्‍स, निफ्टीने पुन्हा ऐतिहासिक कामगिरीचा पल्ला सर केला. सेन्सेक्‍सने विक्रमी ३५ हजारांचा टप्पा ओलांडला, तर निफ्टीनेही नवा उच्चांक प्रस्थापित केला. दिवसअखेर सेन्सेक्‍स ३१० अंशांच्या वाढीसह ३५,०८१.८१ अंशांवर स्थिरावला, तर निफ्टीही ८८.१० अंशांनी वधारून १०,७८८.५५ अंशांवर बंद झाला. 

येत्या वर्षभरात सेन्सेक्‍स ४० हजारांचाही टप्पा ओलांडेल असा विश्वास शेअर बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या आधी २६ डिसेंबर २०१७ ला सेन्सेक्‍सने ३४ हजारांचा टप्पा ओलांडला होता. अवघ्या दोन आठवड्यांत सेन्सेक्‍सने ३५ हजारांपर्यंत उडी घेतल्याने गुंतवणूकदारांमध्ये कमालीचा उत्साह जाणवत आहे. बॅंकिंग, आयटी, एफएमसीजी आणि कॅपिटल गुड्‌स सेक्‍टरमधील सकारात्मक बदलामुळे सेन्सेक्‍सला नवीन उंची गाठता आली. बुधवारी एसबीआय, ॲक्‍सिस बॅंक, इन्फोसिस, अदानी पोर्टस, येस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, एल अँड टी, टीसीएस, आयटीसी लि., डॉ. रेड्डी, सन फार्मा, बजाज ऑटो, पॉवर ग्रीड, एनटीपीसी, एचडीएफसी लि., एम अँड एम आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये तेजी होती.

आयटी क्षेत्रातील समभाग उच्चांकावर पोचले असून, हा चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीतील सकारात्मक बदलाचा परिणाम आहे. आगामी अर्थसंकल्पातून वाहन क्षेत्रातही सकारात्मक बदल होण्याची शक्‍यता आहे. 
- राकेश तार्वे, मुख्य संशोधक, रिलायन्स सिक्‍युरिटीज

Web Title: business news sensex