सेन्सेक्‍सच्या घसरणीला ‘ब्रेक’

वृत्तसंस्था
बुधवार, 21 मार्च 2018

मुंबई : शेअर बाजारात मागील पाच सत्रांत सुरू असलेली घसरण अखेर मंगळवारी थांबली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ७३ अंशांच्या वाढीसह ३२ हजार ९९६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३० अंशांने वधारून १० हजार १२४ अंशांवर बंद झाला.  जागतिक पातळीवरील अनिश्‍चिततेचे वातावरण आणि अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक ‘फेडरल रिझर्व्ह’ची आजपासून सुरू झालेली पतधोरण आढावा बैठक या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत. सेन्सेक्‍समध्ये आज सकाळी सुरवातीला घसरणीचे चित्र होते.

मुंबई : शेअर बाजारात मागील पाच सत्रांत सुरू असलेली घसरण अखेर मंगळवारी थांबली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ७३ अंशांच्या वाढीसह ३२ हजार ९९६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३० अंशांने वधारून १० हजार १२४ अंशांवर बंद झाला.  जागतिक पातळीवरील अनिश्‍चिततेचे वातावरण आणि अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक ‘फेडरल रिझर्व्ह’ची आजपासून सुरू झालेली पतधोरण आढावा बैठक या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत. सेन्सेक्‍समध्ये आज सकाळी सुरवातीला घसरणीचे चित्र होते. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर खरेदीचा जोर वाढल्याने निर्देशांकाने उसळी घेतली. अखेर कालच्या तुलनेत निर्देशांक ७३ अंशांनी वधारून ३२ हजार ९९६ अंशांवर बंद झाला. 

Web Title: business news sensex share market