शेअर बाजारात पुन्हा तेजीची बरसात

पीटीआय
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

मुंबई - वस्तू व सेवाकरातून (जीएसटी) केंद्र सरकारला घसघशीत महसूल मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीने आज शेअर बाजारात तेजीची बरसात झाली. दिवसअखेर सेन्सेक्‍स २५८ अंशांच्या वाढीसह ३१,६४६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात ८८.३५ अंशांची वाढ झाली आणि निफ्टी ९,८८४ अंशांवर बंद झाला. 

मुंबईला पावसाने झोडपल्यानंतर शेअर बाजारातील दैनंदिन उलाढालीत काही प्रमाणात घट झाली. मात्र, तरीही या तेजीने गुंतवणूकदारांची मालमत्ता दीड लाख कोटींनी वाढली. अमेरिका आणि उत्तर कोरियातील तणाव थोडा निवळल्याने गुंतवणूकदारांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. त्यांनी पुन्हा खरेदीला प्राधान्य दिले. गुरुवारी (३१) वायदेपूर्ती होणार असल्याने त्यापूर्वी गुंतवणूकदारांनी खरेदी करून पोर्टफोलिओ संतुलित केला. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, जुलै महिन्यात ‘जीएसटी’तून ९२ हजार कोटींचा महसूल मिळाला. सरकारच्या उद्दिष्टापेक्षा महसूल अधिक मिळाल्याने बाजारात आनंदाचे वातावरण आहे. 

धातू, वित्त सेवा, खाणकाम क्षेत्रातील शेअरला मागणी दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, एल अँड टी, अदानी पोर्ट, जिंदाल स्टील, जिंदाल पॉवर, हिंदुस्थान झिंक, हिंदाल्को, एनएमडीसी, नाल्को, कोल इंडिया, टाटा स्टील, सेल आदी शेअर तेजीसह बंद झाले. त्याचबरोबर एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक, एचयूएल, ओएनजीसी आदी शेअर वधारले. इन्फोसिस, माइंडट्री, केअर रेटिंग्ज, टेक महिंद्रा, एबीबी, आयडीबीआय बॅंक, एनटीपीसी आदी शेअर घसरणीसह बंद  झाले. 

तेल आणि वायू, रिॲल्टी, पीएसयू आदी निर्देशांक वधारून बंद झाले. शेअर बाजाराच्या माहितीनुसार, मंगळवारी स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १३९१ कोटींचे शेअर खरेदी केले. 

Web Title: business news share market GST