साठ टक्के स्टार्टअप अपयशी ठरतील - पै

पीटीआय
गुरुवार, 22 मार्च 2018

जयपूर - स्टार्टअपला भारतामध्ये चांगले भविष्य आहे; मात्र बाजारातील प्रतिकूल परिस्थिती व इतर बाबींचा आढावा घेता साठ टक्के स्टार्टअप अपयशी ठरतील, अशी शक्‍यता ‘इन्फोसिस’चे माजी संचालक मोहनदास पै यांनी व्यक्त केली. भारतामध्ये ३० हजार स्टार्टअपद्वारे साडेतीन लाख लोकांना रोजगार उपलब्ध होत असून, त्यामध्ये पाच ते सहा हजार रोजगारांची वाढ होत आहे, असेही पै म्हणाले.

गेल्या वर्षी १३.६५ अब्ज डॉलरची स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यात आली होती. आजघडीला या स्टार्टअपची किंमत ९५ अब्ज डॉलरच्या घरात पोचली आहे. २०२५ पर्यंत सक्रिय स्टार्टअपच्या माध्यमातून ३२ लाखांवर रोजगारनिर्मिती होणार असल्याचे पै म्हणाले. 

एकूण स्टार्टअपचा विचार केला तर त्यांचा वृद्धीदर कमी आहे. सद्यःस्थिती पाहता जवळपास साठ टक्के स्टार्टअप अपयशी ठरतील.
- मोहनदास पै

Web Title: business news Sixty percent startups will fail mohandas pai