एका दिवसात या’ उद्योजकाने कमावले 18 हजार कोटी!

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

हॉँग कॉंग: ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या 'अलिबाबा'चे संस्थापक जॅक माच्या मालमत्तेत एका दिवसात 2.8 अब्ज डॉलर म्हणजेच भारतीय रुपयात सुमारे 18 हजार कोटींची भर पडली आहे. 'ब्लूमबर्ग'च्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जॅक हा आता आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. सध्या जागतिक श्रीमंतांच्या यादीत मा 14 व्या स्थानी आहे.

जॅक मायांची संपत्ती 2.6 लाख कोटींवर पोचली आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी असलेल्या 'अलिबाबा'ने इतर क्षेत्रात देखील पाय रोवायला सुरूवात केली आहे. त्यामुळे 'अलिबाबा'ने ई-कॉमर्सच्या माध्यमातून डिजिटल जाहिरतींचा मारा सुरू केला आहेत. त्यातून देखील मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते आहे. लवकरच 'अलिबाबा'कडून काही नवीन प्रकल्पांची घोषणा देखील करण्यात येणार आहे.

चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या 'अलिबाबा'चा महसुल 49 टक्क्यांवर पोचण्याची शक्यता आहे. सरलेल्या वर्षात 'अलिबाबा'च्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

Web Title: Businessmen earn 18 thousand crore in one day!