100-200 रुपयांत विकत घ्या टेस्ला, फेसबुक, गुगलसारख्या कंपन्यांचे शेअर्स; कसे ? वाचा...

Share Market
Share MarketSakal

भारतीय शेअर बाजारात आपण पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवू शकतो. सध्या अनेकजण फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD मध्ये पैसे ठेवण्याऐवजी चांगल्या परताव्यासाठी म्युच्युअल फंड (Mutual Fund) किंवा थेट शेअर बाजारात (Share Market) पैसे गुंतवतात. मात्र आपल्या भारतीय शेअर बाजारातील (Indian Share Market) गुंतवणुकीची जोखीम कमी करण्यासाठी आणि गुंतवणुकीत विविधता आणण्यासाठी आता थेट अमेरिकी शेअर्समध्येही (America Shares) तुम्ही गुंतवणूक करू शकतात. (buy facebook tesla google US stocks by investing just hundred or two hundred rupees)

मात्र तुम्ही आता म्हणाल की अमेरिकेतील काही नावाजलेल्या कंपन्यांचे शेअर्स भारतीय चलनात रूपांतरित केल्यास प्रचंड महाग भासतात. मग आमच्याकडे मर्यादित रक्कम असल्यास अमेरिकेतील लिस्टेड कंपनीचा एखादा शेअर घ्यायचा तरी कसा? तर त्यालाही पर्याय उपलब्ध आहेत.अ‍ॅपल, गुगल, अ‍ॅमेझॉन, टेस्ला, फेसबुक, नेटफ्लिक्स यासारख्या कंपन्यांचे शेअर्स आपण भारतीय रुपयांमध्ये कन्व्हर्ट केल्यास आपल्याला ते महाग भासतात. काही शेअर्स भारतीय चलनात लाखांच्याही वरचे आहेत. मात्र तुम्हाला हे शेअर्स विकत घायचे असतील तर काळजी करू नका. कारण फ्रॅक्शनल इन्व्हेस्टिंग सारख्या विकल्पामुळे आता तुम्ही हे ही शेअर्स विकत घेऊ शकतात.

Share Market
आठवड्याचं शेवटचं ट्रेडिंग सत्र, काय असावी आजची स्ट्रॅटजी?

फ्रॅक्शनल इन्व्हेस्टिंग म्हणजे काय ?

सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन अ‍ॅडव्हायजरी आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मवर 'फ्रॅक्शनल इन्व्हेस्टिंग' (fractional investment) ही सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही एखाद्या शेअरचा काही हिस्सा देखील खरेदी करू शकता. म्हणजे सोप्या भाषेत अर्धा शेअर किंवा पाव शेअर देखील तुम्ही खरेदी करू शकतात. हे प्लॅटफॉर्म्स तुम्हाला अगदी एक डॉलरपासून गुंतवणूक करण्याची सुविधा प्रदान करतात. उदाहरणार्थ एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत 100 डॉलर आहे आणि तुम्ही केवळ 10 डॉलरची गुंतवणूक केलीत तर तुम्ही 0.10 टक्क्यांचे हिस्सेदार बनतात.

Share Market
फक्त 5 हजारांची गुंतवणूक करून कमवा बंपर पैसा, येतेय 'ही' नवीन म्युच्युअल फंड स्कीम

अमेरिकी शेअर मार्केटमधील काही महागडे शेअर्स आणि त्यांच्या रुपयांमधील किमती.

  • अ‍ॅपल : 9 हजार 271 रुपये (127 डॉलर)

  • फेसबुक: 24 हजार 090 रुपये (330 डॉलर)

  • टेस्ला: 43 हजार 750 रुपये (599 डॉलर)

  • गूगल: 1 लाख 76 हजार रुपये (2408 डॉलर)

  • अ‍ॅमेझॉन : 2 लाख 40 हजार लाख रुपये (3281 डॉलर)


किती रुपयांची गुंतवणूक करू शकतो ?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लिबरलाइज्ड रेमिटेंस स्कीम (LRS) गाईडलाईन्स अन्वये कोणताही भारतीय नागरिक विदेशी बाजारांमध्ये प्रत्येक आर्थिक वर्षात 2 लाख 50 हजार डॉलर्स म्हणजेच साधारणतः 1 करोड 82 लाखांची रुपयांची गुंतवणूक करू शकतात. ही गुंतवणूक RBI च्या कोणत्याही परवानगी शिवाय केली जाऊ शकते. गुंतवणूकदारांना अशा गुंतवणुकीसाठी भारतीय आणि अमेरिकी नियमांनुसार जन्माचा दाखला, निवासस्थानाचा दाखला आणि PAN कार्डची कॉपी जोडणे बंधनकारक असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com