esakal | आठवड्याचं शेवटचं ट्रेडिंग सत्र, काय असावी आजची स्ट्रॅटजी?
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

येत्या काळात मॉन्सूनची गती कशी राहते यावरही शेअर बाजाराची नजर असणार आहे.

आठवड्याचं शेवटचं ट्रेडिंग सत्र, काय असावी आजची स्ट्रॅटजी?

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : जागतिक बाजारांच्या सकारात्मक संकेतांमुळे कालच्या सत्रात भारतीय बाजार पुन्हा एकदा सावरलेले पाहायला मिळाले. तेजीनं होणारं लसीकरण आणि दुसऱ्या लाटेमुळे तुलनात्मरित्या कमी झालेलं नुकसान, या बातमीमुळे शेअर बाजारात चांगला उत्साह पाहायला मिळाला. अर्थ खात्याच्या एका विभागाच्या मासिक अहवालात असं नमूद करण्यात आलं आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिमाण आर्थिक वर्ष २०२२ च्या मार्च तिमाहीनंतर जाणवणार नाही. (last trading session of the week what would be your strategy on nifty indices)

हेही वाचा: ATM मधून पैसे काढणं पडणार महागात; RBI लागू करणार नवा नियम

LKP Securities च्या रोहित सिंगरे यांच्या मते, येत्या काळात निफ्टी १५,६०० ते १५,८०० मध्ये काही दिवस रेंगाळलेला पाहायला मिळू शकतो. १५,६०० हा निफ्टीचा महत्त्वाचा सपोर्ट आहे. जर निफ्टी १५,६०० खाली बंद झाला तर पुढील मंदी पाहायला मिळू शकते. जर निफ्टी १५,८०० वर बंद झाल्यास निफ्टीची वाटचाल १६,००० आणि पुढील तेजीकडे होऊ शकते.

हेही वाचा: मुंबई : दहिसरमध्ये तीन घरं कोसळली; एकाचा मृत्यू

Sharekhan च्या गौरव रत्नपारखी यांनीही सांगितलं की, एका चांगल्या नफा वसुलीस शेअर बहरात कालच्या सत्रात निफ्टीमध्ये चांगली खरेदी पाहायला मिळाली. शेअर मार्केट याला एका बाउंसबॅकच्या स्वरूपात घेत आहे. काल आलेली मुव्ह ही पुलबॅक म्हणून पहिली जातेय. अशात येत्या काही दिवसात शेअर बाजार एका रेंजमध्ये ट्रेड करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गौरव यांनी देखील नवी तेजी १५,८०० च्या पुढेच येणार असल्याचं सांगितलं आहे. Motilal Oswal चे चंदन तापडिया म्हणाले, १५,९०० आणि १६,००० जाण्यासाठी निफ्टीला १५,७०० च्या वर टिकून राहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खालच्या बाजूला १५,६५० आणि १५,५५० हे महत्त्वाचे सपोर्ट आहेत.

हेही वाचा: GST परिषदेची बैठक १२ जूनला, कोणत्या वस्तूंवरील टॅक्स होईल कमी; जाणून घ्या...

Religare Broking चे अजित मिश्रा सांगतात, शेअर बाजाराची आता नजर विविध राज्यांच्या अनलॉकिंग आणि लसीकरणाच्या वेगावर आहे. येत्या काळात मॉन्सूनची गती कशी राहते यावरही शेअर बाजाराची नजर असणार आहे. जगभरातील मोठ्या बाजारपेठांमध्ये सध्या सर्व मार्केट एका रेंजमध्ये म्हणजेच कन्सॉलिडेशन फेजमध्ये ट्रेड करत आहेत आणि म्हणूनच भारतीय बाजारावर चढाव आणि उत्तर पाहायला मिळत आहेत. अशात बाजारातील नफा वसुलीत देखील चांगल्या क्वालिटी शेअर्सची खरेदी करण्याची स्ट्रॅटेजी कामी येईल असं सांगितलं जातंय.

(Edited by : Ashish N. Kadam)

अर्थविश्वातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.