काय सांगता? निव्वळ नऊ रुपयांत गॅस सिलिंडर; अशी आहे झकास ऑफर

LPG Cylinder
LPG Cylinder

नवी दिल्ली : गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमतींपासून या महिन्यात लोकांना थोडा दिलासा मिळाला आहे. या महिन्यामध्ये गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये 10 रुपयांची घट करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये विना सब्सिडीवाल्या 14.2 किलोग्रॅमच्या LPG गॅस सिलिंडरचे भाव कमी होऊन 809 रुपये झाले आहेत. मात्र, याव्यतिरिक्त आपण जर 10 रुपयांपेक्षा कमी भावात सिलिंडर खरेदी करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्त्वपूर्ण आहे. Paytm एक खास ऑफर देत आहे, ज्याअंतर्गत सिलिंडर खरेदी करण्यावर 800 रुपयांचा कॅशबॅक दिला जातोय. Paytm च्या झकास ऑफरचा  फायदा घेऊन आपण देखील 809 रुपयांचा LPG सिलिंडर निव्वळ 9 रुपयांमध्ये खरेदी करु शकाल. चला तर मग जाणून घेऊयात या ऑफरशी निगडीत सगळ्या अटी आणि शर्थींबाबत...

अशी आहे खास ऑफर
Paytm ग्राहकांना गॅस सिलिंडर बुक करण्यावर 800 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देत आहे. मात्र, Paytm ची ही ऑफर 30 एप्रिल 2021 पर्यंतच उपलब्ध आहे. पेटीएममधून LPG गॅस सिलिंडर बुकींग करण्यावर ग्राहकांना 800 रुपयांपर्यंत कॅशबँक स्क्रॅच कार्ड मिळेल. लक्षात घ्या की, 800 रुपयांपर्यंतचा कॅशबँक फक्त पहिल्या Paytm वरुन गॅस सिलिंडर बुक करण्यावरच मिळेल. या ऑफरसाठी Paytm ने अनेक गॅस कंपन्यांना जोडून घेतलं आहे. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Paytm वरुन कसा बुक कराल ऑफरसहित सिलिंडर

  • जर आपण या ऑफरचा फायदा घेऊ इच्छित असाल तर सर्वांत आधी आपल्याकडे Paytm ऍप असणं गरजेचं आहे. ऍप नसेल तर डाऊनलोड करा. 
  • आता फोनवर पेटीएम ऍप उघडा
  • त्यानंतर Show More वर क्लिक करा
  • त्यानंतर 'Recharge and Pay Bills' सेक्शनवर जा
  • तिथे आपल्याला 'Book a Cylinder' ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • भारत गॅस, एचपी गॅस अथवा इंडेन यांपैकी आपल्या गॅस प्रोव्हायडरला निवडा.
  • त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबर अथवा आपला LPG ID नोंद करा.
  • त्यानंतर आपल्याला पेमेंट करण्याचा पर्याय दिसेल.
  • आता पेमेंट करण्याआधी ऑफरवर जा आणि तिथे 'FIRSTLPG' प्रोमो कोड टाका आणि त्यानंतर पेमेंट करा.
  • बुकींगच्या 24 तासांच्या आत आपल्याला कॅशबॅकचा स्क्रॅच कार्ड मिळेल.
  • लक्षात ठेवा की या स्क्रॅच कार्डचा आपल्याला 7 दिवसांच्या आत वापर करायचा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com