'पीएनबी'नंतर आता कॅनरा बँकेत गैरव्यवहाराचे वारे? 

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 मार्च 2018

मुंबई: केंद्रीय अन्वेषण विभागाने  (सीबीआय)  कॅनरा बँकेचे माजी अध्यक्ष आणि त्यांच्या  इतर पाच सहकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवत आरोपपत्र सादर केले आहे. या आरोपपत्रात  एका खाजगी कंपनीच्या मदतीने 2014 मध्ये बँकेत 68.38 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी, आज मुंबई शेअर बाजारात कॅनरा बँकेच्या शेअरमध्ये इंट्राडे व्यवहारात 5 टक्क्यांची घसरण झाली. 

सीबीआयने बँकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर.के. दुबे, माजी कार्यकारी अधिकारी अशोक कुमार गुप्ता आणि व्हीएस कृष्ण कुमार, माजी उप-महासंचालक मुकेश महाजन, माजी मुख्य महाप्रबंधक टी. श्रीकांतन आणि माजी सह महाप्रबंधक उपेंद्र दुबे यांच्यावर आरोपपत्र पत्र दाखल करण्यात आले आहे. 

 "सीबीआयने तपासणी आणि काही माहिती एकत्रित करून पुरावे गोळा केले आहेत. मात्र भारतीय कायद्यानुसार, न्यायालयात आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांना दोषी ठरवता येणार नाही", असेही सीबीआयने स्पष्ट केले आहे. 

सध्या मुंबई शेअर बाजारात कॅनरा बँकेचा शेअर 4 टक्क्यांच्या घसरणीसह 253.50 रुपयांवर व्यवहार करतो आहे. 

Web Title: Canara Bank Shares Tumble After CBI Charges Ex-Chairman In Loan Fraud Case