गुड न्यूज : ‘या’आयटी कंपनीत होणार मेगाभरती! 

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

कॉलेज कॅम्पसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे. गेल्यावर्षी देखील कंपनीने कॉलेज कॅम्पसच्या माध्यमातून अनेक  पदवीधरांची निवड केली होती.

नवी दिल्ली : बेरोजगारी हे सध्या भारतातील सगळ्यांत मोठी समस्या आहे. अनेकांना पदव्या घेऊनही नोकरीच्या संधी नाहीत. आयटी क्षेत्रातही नोकरीच्या संधी हव्या तशा नसल्यामुळं सध्या चिंतेचं वातावरण आहे. त्यातच एका कंपनीनं मेगाभरती करण्याची घोषणा केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील आघाडीची कॅपजेमिनी चालू वर्षात तब्बल 12 ते 15 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कॉलेज कॅम्पसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे. गेल्यावर्षी देखील कंपनीने कॉलेज कॅम्पसच्या माध्यमातून अनेक  पदवीधरांची निवड केली होती. पदवीधरांची निवड करताना निवड झालेल्या विद्यार्थ्यांना किमान 3.8 लाख रुपयांचे  वेतन देणार आहे. मात्र आयआयटी आणि एनआयटीच्या विद्यार्थ्यांना 6.5 लाख रुपयांपर्यत वार्षिक वेतन दिले जाते. 

आणखी वाचा - 'या' आहेत भारतातील सर्वाधिक तोट्यातील सरकारी कंपन्या

अर्थविश्व संबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या कॅपजेमिनीच्या भारतातील कार्यालयांमध्ये 1.2 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. ही संख्या कंपनीच्या जगभरातील एकूण कर्मचाऱ्यांच्या निम्म्याहून अधिक आहे. कंपनी सध्या 5 जी तंत्रज्ञानावर काम करत असून कंपनीने त्यासाठी पॅरीस आणि मुंबईत दोन केंद्र सुरू केली आहेत, अशी माहिती कंपनीचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन यार्दी यांनी दिली. कॉग्निझंटने देखील चालू वर्षात तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: capgemini it company recruitment 2020 around 15 thousand campus interviews