सेकंड हँड कारसाठी Loan घ्यायचंय? या गोष्टी ठरतील फायदेशीर

तुम्ही सेकेंड हॅंड कार घेण्यासाठी अशा पद्धतीने लोन घेऊ शकता.
Car Loan Application
Car Loan Applicationesakal
Summary

तुम्ही सेकेंड हॅंड कार घेण्यासाठी अशा पद्धतीने लोन घेऊ शकता.

तुम्हाला कार (Car) खरेदी करण्यासाठी कर्ज घेता येते, पण अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की, सेकंड हँड कार (Second Hand Car) घेण्यासाठीही कर्ज घेता येईल का? तर उत्तर होय आहे. जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला कार घ्यायची असेल तर तुम्ही त्यासाठी कर्ज घेऊ शकता. भारतातील अनेक बँका जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, HDFC बँक इत्यादी आणि इतर वित्त कंपन्या अशी कर्जे देतात. सेकंड हँड कार घेण्यापूर्वी कारची संपूर्ण माहिती घ्या. तुम्ही खरेदी केलेली वापरलेली कार कर्जासाठी पात्र आहे की नाही हे देखील तुम्ही शोधून काढले पाहिजे. काही कर्जदाता तीन वर्षांपेक्षा जुन्या कारसाठी कर्ज (Loan) देत नाहीत. तुम्ही सेकेंड हॅंड कार घेण्यासाठी अशा पद्धतीने लोन घेऊ शकता.

Car Loan Application
सेकंड हॅन्ड लॅपटॉप घेण्याचा विचार करताय? मग या ४ गोष्टी तपासूनच करा खरेदी 

बँकेशी साधावा लागेल संपर्क :

तुम्हाला सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी कर्ज घेतेवेळी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्जासाठी, बँकेच्या वेबसाइटला भेट द्या. तुम्हाला ऑफलाइन अर्जासाठी बँकेच्या शाखेत जावे लागेल. तुम्ही युज्ड कार लोनसाठी ऑनलाइन मार्केटप्लेसवर वेगवेगळ्या बँकांचे डिल चेक केले पाहिजेत. तसेच तुमच्या सोयीनुसार कर्ज घेण्यासाठी बँक तुम्हाला किती कर्ज द्यायला तयार आहे हेही पाहावे. फक्त निवडक कर्जदाता तुम्हाला 100 टक्के कर्ज देतात. परंतु, बहुतेक फक्त 80 टक्के सूट देतात.

कारचे कर्ज फायनल करा :

तुम्ही तुमच्या कर्जदात्याशी कर्जाच्या तपशिलांची चर्चा करावी. ज्यासाठी तुम्ही पात्र आहात. तसेच त्याची प्रोसेसिंग फी, व्याजाचा दर, तुम्हाला किती कालावधी हवा आहे आणि EMI काय असेल इ.

Car Loan Application
सेकंड हँड कार खरेदी करताय? या गोष्टी ठेवा लक्षात

यासाठी कोणती कागदपत्रे लागतील?

तुम्हाला अनेक कागदपत्रांची आवश्यकता असेल. ज्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, 3 पासपोर्ट साइजचे फोटोंसह सही केलेला अर्ज, रहिवासी पुराव्यासाठी पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पोस्टपेड युटिलिटी बिल (गॅस किंवा वीज बिल), अपडेट केलेले पासबुक किंवा बँक खाते समाविष्ट आहे. स्टेटमेंट, नोंदणीकृत भाडे करार इ.

दुसरीकडे, जर अर्जदार पगारदार असेल, तर मागील तीन महिन्यांची पगार स्लिप, फॉर्म 16 किंवा आयकर रिटर्नची कागदपत्रे.

जर अर्जदार स्वयंरोजगार (Self-employment) असेल तर मागील दोन वर्षांचा बॅलन्स शीट, व्यवसायाच्या पुराव्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र, सेवा कर नोंदणी, मागील दोन वर्षांचे आयटीआर कागदपत्रे, आयटी असेसमेंट/क्लिअरन्स प्रमाणपत्र, आयकर चलन/टीडीएस प्रमाणपत्र/फॉर्म 26 AS आवश्यक असेल.

पजेशन कसा मिळवायचा?

तुमच्या कर्जाची रक्कम मंजूर झाल्यावर, विक्रेत्याला त्याच्या खात्यात पैसे मिळतील आणि तुम्ही विक्रेत्याला डाउन पेमेंट करू शकता. यानंतर तुम्ही वापरलेल्या कारचा ताबा (पजेशन) घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com