वाहन उद्योगाने घेतला 'वेग'; वाहनांची विक्री वाढली 

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 एप्रिल 2018

भारतीय वाहन उद्योगाची बाजारपेठ झपाट्याने वाढते आहे. गेल्या आर्थिक वर्षात वाहन उद्योगाने एक अंकी उच्चांकी पातळी गाठली असून अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे खुणावत आहे.

मुंबई: भारतीय वाहन उद्योगाची बाजारपेठ झपाट्याने वाढते आहे. गेल्या आर्थिक वर्षात वाहन उद्योगाने एक अंकी उच्चांकी पातळी गाठली असून अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे खुणावत आहे. वाहन उद्योगात नोटाबंदी आणि त्यानंतर लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवाकरामुळे मंदीचे वातावरण होते. मात्र दुसऱ्या सहामाहीत परिस्थिती सावरली असून वाहन विक्री वेगाने वाढ झाली आहे. 

वाहन कंपन्यांनी मार्च महिन्यातील वाहनांच्या विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, मार्चमध्ये म्हणजेच आर्थिक वर्षातील अखेरच्या महिन्यात प्रवासी विक्री वाढ प्रवासी, व्यावसायिक आणि ट्रॅक्टरच्या विक्रीत मोठी झाल्याचे समोर आले आहे. 

देशातील सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने वाहनांच्या विक्रीत 15.3 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. गेल्या महिन्यात 1,47,170 मोटारींची विक्री केली आहे. मिनी कार श्रेणीमध्ये (अल्टो आणि वॅगन) विक्री 21 टक्क्यांनी वाढली आहे. या महिन्यात 37,511 वाहनांची विक्री करण्यात आली. तर कॉमपॅक्ट्स (स्विफ्ट, बलेनो, सेलेरीओ, डिझायर आणि टूर एस) श्रेणीमध्ये 68,885 मोटारींची विक्री करण्यात आली असून त्यात 13.5 टक्क्यांची वाढ झळी आहे. 

मात्र सेडान सिआजची मागणी 12 टक्क्यांनी घसरून 4,321 युनिट्सवर आली आहे. युटिलिटी वाहने श्रेणीमध्ये (एर्टिगा, एस-क्रॉस,  ब्रेझा) विक्रीचा वेग 24.3 टक्क्यांवर कायम आहे. या श्रेणीमध्ये विक्री 22,764 मोटारींची विक्री झाली आहे. 

टाटा मोटर्सने मार्च महिन्यात 31 टक्क्यांची वाढ नोंदवली असून 20,266 मोटारींची विक्री केली आहे. टाटाच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीमधील 'नेक्सॉन'च्या विक्रीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. व्यावसायिक वाहन विभागाचे अध्यक्ष गिरीश वाघ म्हणाले,'' व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत टाटा पहिल्या स्थानावर टिकून आहे. शिवाय पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी सरकारने सुधारणांची मोहिम हाती घेतली आहे. रस्तेबांधणी आणि खाण व्यवसाय अशी विकासाची कामे हाती घेतली असल्याने परिणामी एमएचसीव्ही सेगमेंटमध्ये म्हणजेच मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांच्या मागणीत वाढ झाली आहे.'' 
 

Web Title: Car sales strong in FY18 despite GST, demonetisation effect