Air-Bag
Air-Bag

भारतातील कार्स होणार आता अधिक सुरक्षित; सहा एअरबॅग्जचा केंद्राचा प्रस्ताव

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ऑटो उत्पादकांना महत्वाचा सल्ला

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच देशातील मोठ्या ऑटो मॅन्युफॅक्चररसोबत महत्त्वाची बैठक घेतली. यामध्ये रस्त्यावर होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी सर्व उत्पादकांना नितीन गडकरी यांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे. मंत्री नितीन गडकरी यांनी गाड्यांच्या सर्व व्हेरिएंटमध्ये कमीत कमी सहा एअर बॅग्ज लावण्याचा सल्ला दिला आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार

नितीन गडकरी यांनी आज SIAM म्हणजेच सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चररच्या CEO यांच्या एका गटासोबत बैठक घेतली. या बैठकीत नितीन गडकरी यांनी कार मॅनिफॅक्चरर्सना रस्त्यांवरील अपघात कमी करण्यावर भर देण्यास सांगितलं. ज्यामध्ये त्यांनी गाडीत किमान सहा एअर बॅग्ज बसवल्या जाव्यात असा सल्ला दिला आहे. नितीन गडकरी यांनी ऑटो सेक्टरच्या विक्री आणि आणि एकूण कामगिरीचा आढावा घेतला.

फ्लेक्स इंधनावर भर

यासोबतच केंद्रीय मंत्र्यांनी वाहन उद्योगाला एका वर्षात भारतीय बाजारात 100 टक्के इथेनॉल आणि पेट्रोलवर चालण्यास सक्षम फ्लेक्स-इंधन वाहने (FFVs) आणण्यास सांगितले आहे.

BS 6 बाबत काय निर्णय?

या बैठकीत CAFE 2 आणि बीएस (BS6) च्या दुसऱ्या टप्प्याचे नियम पुढे ढकलण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. ऑटो इंडस्ट्रीने CAFE 2 चे नियम 2023 पर्यंत आणि BS VI चा दुसरा टप्पा 2024 पर्यंत पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com