कॅश मार्केटचे 2 मजबूत स्टॉक्स! येत्या काळात उत्तम रिटर्न देणार

या शेअर्समध्ये पैसे गुंतवून तुम्ही शॉर्ट ते लाँग टर्ममध्ये चांगले पैसे कमवू शकतात.
Stock to Buy
Stock to BuyEsakal
Summary

या शेअर्समध्ये पैसे गुंतवून तुम्ही शॉर्ट ते लाँग टर्ममध्ये चांगले पैसे कमवू शकतात.

Stocks to Buy : शेअर बाजार (Share Market) तज्ज्ञ विकास सेठी यांनी शेअर बाजारात खरेदीसाठी 2 मजबूत स्टॉक्स निवडले आहेत. या शेअर्समध्ये पैसे गुंतवून तुम्ही शॉर्ट ते लाँग टर्ममध्ये चांगले पैसे कमवू शकतात. सेठी फिनमार्टचे एमडी आणि एक्सपर्ट विकास सेठी यांनी कॅश मार्केटमधील 2 मजबूत स्टॉक्स निवडले आहेत. ज्यात स्टोव्ह क्राफ्ट (Stove Kraft)आणि स्टार हेल्थचा (Star Health) समावेश आहे.

Stock to Buy
Share Market : कॅश मार्केटमधील 'हा' स्टॉक देणार दमदार परतावा!

स्टोव्ह क्राफ्ट (Stove Kraft)

देशातील आघाडीच्या किचन अप्लायन्स कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. अर्थसंकल्प डोळ्यासमोर ठेवून रिअल इस्टेट आणि गृहनिर्माण क्षेत्रावर अधिक भर दिला जात असल्याचे या तज्ज्ञांनी सांगितले. या कंपनीचे देशात 34 पेक्षा जास्त डीलर्स आहेत आणि ही कंपनी 14 पेक्षा जास्त देशांमध्ये आपला माल निर्यात करते.

स्टोव्ह क्राफ्ट (Stove Kraft)

- सीएमपी (CMP) - 974.65 रुपये

- टारगेट (Target) - 1025 रुपये

- स्टॉप लॉस (Stop Loss) - 940 रुपये

कंपनीचे फंडामेंटल्स ?

कंपनीची फंडामेंटल्स अतिशय भक्कम आहेत. रिटर्न ऑन इक्विटी 26 टक्के आहे. डेट इक्विटी रेश्यो 0.17 टक्के आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीला 22 कोटी रुपयांचा नफा झाला होता, तर जून महिन्यात कंपनीला 13 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

Stock to Buy
कॅश मार्केटमधील 2 जबरदस्त शेअर्स, अल्पावधीत देतील मोठी कमाई

स्टार हेल्थचा (Star Health)

विकास सेठी यांनी दुसरा शेअर इन्श्युरंस सेक्टरमधून दिला असून या क्षेत्राबाबतही अर्थसंकल्पात अपेक्षा आहेत. ही देशातील सर्वात मोठी आरोग्य विमा कंपनी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. रिटेल हेल्थ इन्श्युरंसमध्ये या कंपनीचा 31 टक्के हिस्सा आहे.

स्टार हेल्थ (Star Health)

- सीएमपी (CMP) - 816.20 रुपये

- टारगेट (Target) - 860 रुपये

- स्टॉप लॉस (Stop Loss) - 790 रुपये

स्टार हेल्थचा (Star Health) देशातील 1100 रुग्णालयांशीही करार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. शेअर मार्केटचे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचाही या शेअर्समध्ये सुमारे 14 टक्के हिस्सा आहे. हा स्टॉक शॉर्ट टर्ममध्ये चांगली कमाई करू शकतो.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com