एटीएममधून साडेचार हजार रुपये काढता येणार

वृत्तसंस्था
शनिवार, 31 डिसेंबर 2016

नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या 52 दिवसांत पैसे मिळवताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहेत. आता नवीन वर्षात हा त्रास थोडा कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर एटीएममधून पैसे काढण्यावर घालण्यात आलेली मर्यादा आता वाढविण्यात आली असून, ती अडीच हजारांवरून साडेचार हजारांवर नेण्यात आली आहे. 

एक जानेवारी 2017 पासून नागरिकांना एटीएममधून साडेचार हजार रुपये रोज काढता येतील, असा नवा आदेश रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केला आहे. पण, पैसे काढण्याची दररोजची मर्यादा वाढविली असली तरी आठवड्याला अद्याप 24 हजारांपेक्षा जास्त पैसे तुम्ही काढू शकणार नाहीत. या निर्णयामध्ये कोणताही बदल आरबीआयने केलेला नाही. 

नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या 52 दिवसांत पैसे मिळवताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहेत. आता नवीन वर्षात हा त्रास थोडा कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. नोटाबंदी करून कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. मात्र, अद्याप बँका व एटीएमबाहेर नागरिकांच्या रांगा पहायला मिळत आहेत. बँकांमध्ये जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याची मुदत 30 डिसेंबरला संपली आहे.

Web Title: Cash withdrawal limit from ATMs increased to Rs 4,500 per day from January 1