‘सीडीएसएल’च्या शेअरची 250 रुपयांवर शानदार नोंदणी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जून 2017

मुंबई: सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेसच्या (सीडीएसएल) शेअरची राष्ट्रीय शेअर बाजारात शानदार नोंदणी झाली आहे. "सीडीएसएल'च्या शेअरची राष्ट्रीय शेअर बाजारात 250 रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्चित केलेल्या रु.149 या इश्यू प्राइसपेक्षा 68 टक्के अधिक वाढीसह शेअरची नोंदणी झाली. कंपनीने गुंतवणूकदारांना रु.149 प्रतिशेअरप्रमाणे शेअर्सचे वाटप केले होते. सीडीएसएलच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांकडून आयपीओला मोठा प्रतिसाद मिळाला.

मुंबई: सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेसच्या (सीडीएसएल) शेअरची राष्ट्रीय शेअर बाजारात शानदार नोंदणी झाली आहे. "सीडीएसएल'च्या शेअरची राष्ट्रीय शेअर बाजारात 250 रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्चित केलेल्या रु.149 या इश्यू प्राइसपेक्षा 68 टक्के अधिक वाढीसह शेअरची नोंदणी झाली. कंपनीने गुंतवणूकदारांना रु.149 प्रतिशेअरप्रमाणे शेअर्सचे वाटप केले होते. सीडीएसएलच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांकडून आयपीओला मोठा प्रतिसाद मिळाला.

सध्या मुंबई शेअर बाजारात सीडीएसएलचा शेअर 256.60 रुपयांवर व्यवहार करत असून तो 6.60 रुपयांनी म्हणजेच 2.64 टक्क्यांनी वधारला आहे.

सीडीएसएलने या इश्‍यूसाठीचा किंमतपट्टा रु. 145 ते रु. 149 असा ठेवला होता. सकाळमनीने शेअरची 225-250 रुपयांवर नोंदणी होण्याची शक्यता आधीपासूनच व्यक्त केली होती.

कंपनीने 524 कोटी रुपयांचे भांडवल उभारणीचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र त्याबदल्यात कंपनीला 31,000 कोटींच्या बोली प्राप्त झाल्या होत्या. म्हणजेच प्रस्तावित योजनेत, कंपनीने 2.48 कोटी शेअर्सची विक्री करण्याचे ठरविले होते. मात्र कंपनीकडे 209 कोटी शेअर्सच्या खरेदीसाठी अर्ज करण्यात आले.

शेअर बाजारातील 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना एका दिवसात कमावून दिले 10 हजार रुपये
आयपीओसाठी अर्ज करताना किमान 100 शेअर्ससाठी अर्ज करणे बंधनकारक होते. त्यामुळे कंपनीने आयपीओसाठी अर्ज करणार्‍या गुंतवणूकदारांना 149 रुपये प्रतिशेअर प्रमाणे 100 शेअर्स दिले. म्हणजेच 14900 रुपयात गुंतवणूकदारांना 100 शेअर्स मिळाले. आज शेअर बाजारात शेअरची नोंदणी झाल्यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना देऊ केलेल्या एका 149 रुपयांच्या शेअरचा भाव 250 रुपयांवर पोचला आहे. म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला प्रतिशेअर 101 रुपयांचा फायदा झाला आहे. म्हणजेच एका 100 शेअर्सच्या लॉट मागे एका दिवसात गुंतवणूकदाराला 10,100 रुपयांचा फायदा झाला आहे.

सीडीएसएल काय काम करते?

सीडीएसएल ही बीएसई लिमिटेडची उपकंपनी असून, सिक्‍युरिटीज डिपॉझिटरी म्हणून काम करते. डीमॅट अकाउंट उघडणे, अकाउंट स्टेटमेंट, प्लेजिंग, सिक्‍युरिटीजचे ट्रान्समिशन, नॉमिनेशन, पत्ता बदलणे, बॅंक खाते तपशील आणि डिपॉझिटरी सहभागींसाठी एसएमएस सेवा यासारख्या विविध सेवा ही कंपनी प्रदान करते. अलीकडील काळात भांडवल बाजारातील गुंतवणूकदारांसाठी व मध्यस्थांसाठी केवायसी सेवा आणि विविध विमा कंपन्यांच्या विमा पॉलिसीधारकांना इलेक्‍ट्रॉनिक स्वरूपात विमा पॉलिसी घेण्याची सुविधा; तसेच ई-व्होटिंग, ई-लॉकर आणि इच्छापत्र (विल) तयार करण्यासारख्या इतर ऑनलाइन सेवा पुरविते. या विविध सेवा सीडीएसएल व्हेंचर्स, सीडीएसएल इन्शुरन्स रिपॉझिटरी, सीडीएसएल कमोडिटी रिपॉझिटरी या उपकंपन्यांमार्फत पुरविल्या जातात. मागील तीन वर्षांमध्ये कंपनीचे उत्पन्न रु. 145 कोटींपासून रु. 187 कोटी, तर निव्वळ नफा रु. 57 कोटींपासून रु. 86 कोटी इतका वाढला आहे. कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त असून, 31 मार्च 2017 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण नेटवर्थ रु. 533 कोटी होती. त्यानुसार पुस्तकी मूल्य रु. 51 प्रति शेअर आहे. ताळेबंदात रोख आणि समतुल्य गुंतवणूक रु. 548 कोटी आहे.

आजघडीला आपल्या देशात दोनच डिपॉझिटरी काम करतात. त्यामुळे एकूणच स्पर्धा कमी आहे. तसेच, आगामी काळात म्युच्युअल फंड, विमा आदी इलेक्‍ट्रॉनिक स्वरूपात येत आहेत. तसेच, एकूण डीमॅटबद्दल सजगता वाढत जाईल. त्यामुळे कंपनीला भवितव्य चांगलेच राहणार आहे.

Web Title: CDSL shares worth Rs 250 each