esakal | केंद्र सरकारचा 20 कंपन्यांमधील हिस्सेदारी विकण्याचा निर्णय ; तर सहा कंपन्या बंद करण्याचा विचार    
sakal

बोलून बातमी शोधा

Finance Minister sakal.jpg

केंद्र सरकारने 20 कंपन्या (सीपीएसई) आणि त्याच्यातील सरकारची हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, सरकारी मालकीच्या सहा कंपन्या देखील बंद करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.

केंद्र सरकारचा 20 कंपन्यांमधील हिस्सेदारी विकण्याचा निर्णय ; तर सहा कंपन्या बंद करण्याचा विचार    

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

केंद्र सरकारने 20 कंपन्या (सीपीएसई) आणि त्याच्यातील सरकारची हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, सरकारी मालकीच्या सहा कंपन्या देखील बंद करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी याबाबतची माहिती आज सोमवारी लोकसभेत दिली. सरकार धोरणात्मक भागभांडवल विक्री आणि अल्पसंख्याक भागभांडवलातून निर्गुंतवणुकीच्या धोरणाची अंमलबजावणी करत असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. 

कोरोना लस सर्वांना मिळण्यास 2024 उजाडणार - सिरम इन्स्टिट्यूट

लोकसभेत लेखी उत्तरात अनुरागसिंग ठाकूर यांनी, नीती आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने 2016 पासून 34 प्रकरणांमध्ये धोरणात्मक निर्गुंतवणुकीस मान्यता दिली असल्याचे सांगितले. याशिवाय यातील 8 कंपन्यांमधील निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले असून, 6 सीपीएसई कंपन्या बंद करण्याचा विचार सुरु असल्याचे म्हटले आहे. याव्यतिरिक्त इतर 20 कंपन्यांमधील सरकारची हिस्सेदारी कमी करण्याची प्रक्रिया वेगळ्या टप्प्यावर असल्याचे अनुरागसिंग ठाकूर यांनी सांगितले. 

सोन्याच्या दरात वाढ, तर चांदीही महागली

सरकार ज्या सहा कंपन्या बंद करण्याचा विचार करीत आहेत त्यात हिंदुस्तान फ्लोरोकार्बन्स लिमिटेड (एचएफएल), स्कूटर्स इंडिया, भारत पंप्स आणि कम्प्रेशर्स लिमिटेड, हिंदुस्तान प्रीफेब, हिंदुस्तान न्यूजप्रिंट आणि कर्नाटक अँटीबायोटिक्स अँड फार्माकॉसिल लिमिटेड यांचा समावेश आहे. तर ज्या 20 कंपन्यांमध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यात आहे त्यांच्यात प्रोजेक्ट अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड, अभियांत्रिकी प्रकल्प (इंडिया) लिमिटेड, ब्रिज आणि रूफ को इंडिया लिमिटेड, सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (सीसीआय), सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत अर्थ मूवर्स लिमिटेड (बीईएमएल) फेरो स्क्रॅप कॉर्पोरेशन लिमिटेड, नागरनर येथील स्टील प्लांट, आलोय स्टील प्लांट, दुर्गापूर येथील सालेम स्टीम प्लांट; सेलच्या भद्रावती युनिट्स, पवन हंस, एअर इंडिया व त्यांच्या उपकंपन्या यांचा समावेश आहे. 

पावसाळी अधिवेशन 2020 Update : पहिल्या दिवसातील महत्त्वपूर्ण बातम्या एका क्लिकवर

त्याशिवाय एचपीएल लाइफ केअर लिमिटेड, इंडियन मेडिसिन अँड फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड, भारतीय टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (आयटीडीसी), हिंदुस्तान अँटीबायोटिक्स, बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स, भारत पेट्रोलियम लिमिटेड, नुमालीगड रिफायनरी लिमिटेड, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कंटेनर कॉर्पोरेशन भारत आणि निलांचल इस्पात लिमिटेड यांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 17 खासदारांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

एचपीसीएल, आरईसी, हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सल्टन्सी, नॅशनल प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन कॉर्पोरन्सी, ड्रेजिंग कॉर्पोरेशन, टीएचडीसी इंडिया लिमिटेड, ईशान्य इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड आणि कामराजर पोर्ट यांची विक्री झालेली आहे.