मोदींच्या 'या' निर्णयामुळे येणार अच्छे दिन!

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नवी दिल्ली: पाच राज्यांमध्ये झालेला पराभव आणि येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने गरिबांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत सर्व गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन (घरगुती गॅस सिलिंडर) देण्याच्या प्रस्तावाला मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता गरीब कुटुंबाला मोफत एलपीजी कनेक्शन मिळणार आहे.  या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांतील महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे. 

केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेचा विस्तार करण्याच्या निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत आता ज्या गरीब कुटुंबांना एलपीजी कनेक्शन मिळालेले नव्हते किंवा याच्यासाठी पात्र नव्हते अशा सर्वांना घरगुती गॅस सिलिंडर मिळणार आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. मोदींनी देशभरातील 100 टक्के कुटुंबांपर्यंत एलपीजी कनेक्शन पोचवण्याची घोषणा केली होती. उज्ज्वला योजनेअंतर्गत केंद्र सरकार तेल कंपन्यांना 1600 रुपये अनुदान देते. हे अनुदान गॅस सिलिंडरच्या जोडणीसाठी दिले जाते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Centre Approves Extension of Ujjwala LPG Scheme to All Poor Households