भारतीय उत्पादनांवर चीनकडून शुल्क कमी

यूएनआय
गुरुवार, 28 जून 2018

बीजिंग - भारत, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया आणि लाओस या देशांमधील उत्पादनांवरील आयात शुल्कात चीनने कपात करण्याची घोषणा केली आहे. 

चीनच्या अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २ हजार ३२३ प्रकारच्या वस्तूंवरील आयात शुल्कात कपात केली जाणार आहे. यामध्ये काही रसायने, ऑप्टिकल कॉम्पोनन्ट आणि दूरचित्रवाणी कॅमेरे यांचा समावेश आहे. आशिया-प्रशांत व्यापार करार २००१ नुसार चीनने हा नर्णय घेतला आहे. चीनचा जागतिक व्यापार संघटनेत (डब्ल्यूटीओ) समावेश होण्याआधी हा करार झाला होता. 

भारत, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया आणि लाओस या पाच देशांमधील सोयाबीनवरील आयात शुल्क हटविण्यात आले आहे. याआधी हे शुल्क तीन टक्के होते. याचबरोबर सोयाबीनच्या खाद्यपदार्थांवरील पाच टक्के आयात शुल्कही माफ केले आहे.

अडीच लाख टन निर्यात  
भारत हा सोयाबीनचा मोठा निर्यातदार आहे. गेल्या वर्षी भारताने २ लाख ६९ हजार २७५ टन सोयाबीनची निर्यात केली होती. आशिया-प्रशांत व्यापार करारातील सहा सदस्य देशांमध्ये चर्चा झाल्यानंतर हा आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Charge fees less from China on Indian products