कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध आरोपपत्र

पीटीआय
गुरुवार, 14 जून 2018

नवी दिल्ली - एअरसेल-मॅक्‍सिस आर्थिक गैरव्यवहार-प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज दिल्ली न्यायालयात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. 

अतिरिक्त सत्र न्यायाधीश रुबी अलका गुप्ता यांनी, या आरोपपत्रावर ४ जुलै रोजी विचार करू, असे सांगितले. आरोपपत्रात मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्याच्या कलम चार अंतर्गत कार्ती यांच्याशिवाय अन्य चार लोकांच्या नावांचाही समावेश करण्यात आला. 

एअरसेल-मॅक्‍सिस प्रकरणात २०११ आणि २०१२ मध्ये अनुक्रमे केंद्रीय अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचालनालयाद्वारे दाखल दोन प्रकरणात कार्ती यांना दहा जुलैपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे.

पी. चिदंबरम यांच्या नावाचाही उल्लेख
ईडीने आरोपपत्रात अनेक ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. मात्र त्यांना या प्रकरणात आरोपी बनविण्यात आलेले नाही. याप्रकरणी ईडी पुरवणी आरोपपत्रही दाखल करण्याची शक्‍यता आहे.  त्यामुळे पी. चिदंबरम यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता  आहे.

Web Title: Chargesheet against Karti Chidambaram