येस बँकेच्या संस्थापकाविरूद्ध आरोपपत्र दाखल   

पीटीआय
Saturday, 27 June 2020

सीबीआयने गुरुवारी येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्याविरुद्ध आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आरोपपत्र दाखल केले.  सहाशे कोटींची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवी दिल्ली -  सीबीआयने गुरुवारी येस बँकेचे संस्थापक राणा कपूर, त्यांची पत्नी बिंदू आणि मुलगी रोशिनी यांच्याविरुद्ध आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान यांच्याकडून सहाशे कोटींची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मुंबईतील विशेष न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात दिवान हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) वाधवान, त्यांचा भाऊ राजेश, बेलिफ रियाल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड, आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीआयटी अर्बन व्हेंचर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडची नावे असून, त्यांच्यावर कलम ‘१२० बी’अंतर्गत गुन्हेगारी कट रचणे आणि भारतीय दंडसंहिता कलम ४२० (फसवणूक) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chargesheet filed against the former Chief Executive Officer of Yes Bank