
Gold price Updates: अक्षय तृतीयेला सोने खरेदी करतायं? जाणून घ्या दर
Gold, Silver Price Updates: अक्षय तृतीयेला (Akshaya Tritiya 2022) अनेकजण सोने खरेदी करतात. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याक़डे लोकांचा कल वाढलाय.
ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने (Axis securities) अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याचा सल्ला दिला असून, म्हटलं की यावेळी सोने खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 1.5 टक्क्यांनी घसरून 50,992 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही 1.8 टक्क्यांनी घसरण झाली असून तो 63,200 रुपये प्रतिकिलोवर व्यवहार करत आहे.
हेही वाचा: Gold Silver Price: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर
बाजारात खऱ्यासोबतच बनावट सोनंही
सध्या बाजारात खऱ्यासोबतच बनावट सोनंही मोठ्या प्रमाणात मिळू लागलं आहे. अशा परिस्थितीत सोने खरेदी करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सोने खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतल्यास बनावट सोने खरेदी करणे टाळता येते. चला तर मग आम्ही तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घ्या, खरे किंवा खोटे सोने कसे तपासाल?
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
हेही वाचा: महिन्याला फक्त 1 रुपयात मिळेल 2 लाखाचे विमा संरक्षण, कसे जाणून घेऊयात...
22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.
हॉलमार्क (Hallmark)-
सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.
Web Title: Check Gold Price Todays Update As Akshaya Tritiya Is Celebrated As A Day When People Purchase Gold
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..