महिन्याला फक्त 1 रुपयात मिळेल 2 लाखाचे विमा संरक्षण, कसे जाणून घेऊयात...| Pradhan Mantri Suraksha Bima Yojana | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana
महिन्याला फक्त 1 रुपयात मिळेल 2 लाखाचे विमा संरक्षण, कसे जाणून घेऊयात...| Pradhan Mantri Suraksha Bima Yojana

महिन्याला फक्त 1 रुपयात मिळेल 2 लाखाचे विमा संरक्षण, कसे जाणून घेऊयात...

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana: विमा आज प्रत्येक व्यक्तीसाठी खूप आवश्यक झाला आहे. विशेषतः जर तुम्ही कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती असाल तर तुमच्यासाठी विमा अतिशय गरजेचा आहे. अशात कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी सरकारने अनेक विमा योजना सुरू केल्यात. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही अशीच एक योजना आहे.

पीएम सुरक्षा विमा योजनेची खासियत म्हणजे ती खूपच स्वस्त आहे. दरमहिन्याला फक्त 1 रुपये खर्च करुन 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळू शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला एका वर्षात फक्त 12 रुपये प्रीमियम भरावा लागेल. विमा उतरवलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला 2 लाख रुपये मिळतात. जर विमा उतरवलेली व्यक्तीचा अपघात झाला तर त्याला एक लाख रुपये मिळतात.

विमा पॉलिसी कोण खरेदी करू शकतं?
18 ते 70 वर्षे वयाची कोणतीही व्यक्ती पीएम सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊ शकते. यासाठी तुमचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. पॉलिसी पुढील वर्षी 1 जून ते 31 मे पर्यंत वैध असेल. दरवर्षी त्याचे नूतनीकरण केले जाऊ शकते. ही मुदत योजना आहे, त्यामुळे व्यक्तीने भरलेला प्रीमियम परतावा मिळत नाही.

पॉलिसीधारकाचा अपघात झाल्यास 30 दिवसांच्या आत दावा करावा लागेल. क्लेम सेटल होण्यासाठी जास्तीत जास्त 60 दिवसांचा कालावधी लागतो. या पॉलिसीचा प्रीमियम तुमच्या बँक खात्यातून आपोआप कापला जातो. म्हणूनच तुमच्या बँक खात्यात शिल्लक असणे महत्त्वाचे आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.