वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्‍यापूर्वी आपली पात्रता तपासा

Check your Eligibility Before you Apply for a Personal Loan article by Bajaj Finserv
Check your Eligibility Before you Apply for a Personal Loan article by Bajaj Finserv

सुरक्षित कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज मिळवणे खूप सोपे आहे. तुम्‍हाला वित्तपुरवठा करण्यासाठी तारण ठेवण्याची गरज नाही आणि कोणत्‍याही त्रासांशिवाय तुम्‍ही कर्जासाठी पात्र ठरू शकता.

खरं तर, कर्जदात्‍यांनी आज कर्ज देण्याची प्रक्रिया खूप वेगवान केली आहे, जेणेकरून तुमच्‍या पसंतीच्या कर्जदात्‍याकडून तुम्‍हाला घरामध्‍येच सोयीस्कररित्या १०० टक्‍के ऑनलाइन वैयक्तिक कर्ज मिळू शकेल. पण, तुम्‍ही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करता तेव्हा त्‍वरित वैयक्तिक अर्ज असले तरी मंजूरी मिळण्‍याची हमी नसते. त्‍याऐवजी, तुमचा अर्ज मंजुरी व सत्‍यापन प्रक्रियेच्‍या अधीन आहे आणि कर्जदात्‍याचे पात्रता निकष पूर्ण केल्‍यानंतरच तुम्‍हाला कर्ज मंजूर होते.

हे निकष परताव्‍याच्‍या खात्रीसाठी आहेत आणि तुमचा क्रेडिट स्‍कोअर, परतावा इतिहास व चालू उत्‍पन्‍न अशा पैलूंशी संबंधित असतात. वैयक्तिक कर्जासाठी पात्रता निकषाची पूर्तता करण्‍याबाबत अधिक माहितीसाठी पुढे वाचा.

उच्‍च क्रेडिट स्‍कोअर राखा

तुमचा क्रेडिट स्‍कोअर (credit score) त्‍वरित वैयक्तिक कर्ज मंजूर होण्‍यामध्‍ये मुख्‍य भूमिका बजावतो. क्रेडिट स्‍कोअर हा एक अंक आहे, जो तुमच्या कर्ज पात्रतेचा अंदाज सांगतो. वैयक्तिक कर्ज असुरक्षित असल्‍यामुळे कर्जदाता चुकीच्‍या बाबतीत कोणतीही सूट देईल याबाबत कोणतीच खात्री नसते. म्‍हणूनच, तुमचे आर्थिक प्रोफाइल अत्‍यंत महत्त्वाचे ठरते.

सिबिल सारख्‍या एजन्‍सीज क्रेडिट स्‍कोअर्स देतात आणि याची रेंज ३०० ते ९०० गुणांदरम्‍यान असते. ७५० किंवा त्‍यापेक्षा अधिक असलेला स्कोअर उत्तम मानला जातो. असा स्‍कोअर असलेल्‍या अर्जदारांचे वैयक्तिक कर्ज मान्‍य केले जाते.

तुमचा क्रेडिट स्‍कोअर कर्जासंदर्भातील मागील इतिहास, सध्‍याचे कर्ज, कर्जासाठी पात्रता आणि कर्ज वापराचे प्रमाण अशा घटकांवर आधारित असतो. योग्‍य रेंजमध्‍ये तुमचा क्रेडिट स्‍कोअर ठेवण्‍याचा प्रयत्‍न करा, तो म्‍हणजे ७५० व त्‍यापेक्षा अधिक. तुम्‍ही हे खालील गोष्‍टी करत करू शकता: 

  • वेळेवर चालू ईएमआय भरा.
  • कर्ज वापराचे प्रमाण ३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी ठेवा.
  • एकाच वेळी कर्जासाठी विविध अर्ज करणे टाळा.
  • सुरक्षित व असुरक्षित मिश्रण असलेल्‍या कर्जांसाठी अर्ज करा.
  • अधिक प्रमाणात कर्ज घेणे टाळा.

७५० पेक्षा कमी क्रेडिट स्‍कोअर असल्‍यास तुम्‍ही कर्जासाठी अपात्र ठरू शकत नाही, पण तुमचा स्‍कोअर कमी होत जातो, तसे कर्ज देण्‍याची जोखीम वाढत असल्‍यामुळे देण्‍यात येणारा व्‍याजदर देखील वाढू शकतो.

तुमचे कर्ज-ते-उत्‍पन्‍न प्रमाण कमी ठेवा

ऑनलाइन वैयक्तिक कर्जासाठी तुमचा अर्ज मंजूर होण्‍यासाठी तुमच्‍या क्रेडिट स्‍कोअर व्‍यतिरिक्‍त कर्जदाते आणखी एका घटकाची तपासणी करतात, तो म्‍हणजे कर्ज-ते-उत्‍पन्‍न प्रमाण. हे तुमच्‍या चालू उत्‍पन्‍नाचे प्रमाण आहे, जे तुमच्‍या एकूण कर्जाच्‍या सर्विसिंगमध्‍ये जाते.

तुमच्‍या उत्‍पन्‍नाचा ६० टक्‍के भाग घरगुती खर्च व निश्चितजबाबदा-यांसाठी आवश्‍यक असू शकतो. असे असले तरी तुम्‍ही तुमचे कर्ज-ते-उत्‍पन्‍न प्रमाण ४० टक्‍क्‍यांपेक्षा कमी ठेवण्‍याचा प्रयत्‍न करा. तुमचे कर्ज-ते-उत्‍पन्‍न प्रमाण तुमच्‍या क्रेडिट स्‍कोअरसाठी महत्त्वपूर्ण घटक आहे. तुमचा क्रेडिट स्‍कोअर उच्‍च असेल आणि तुमच्‍याकडे EMI भरण्‍यासाठी प्रत्‍येक महिन्‍याला अतिरिक्‍त पैसे नसतील तर हा घटक उपयुक्‍त ठरू शकतो.

बजाज फिनसर्व्‍ह सारखे कर्जदाते तुम्‍हाला तुमचे मासिक उत्‍पन्‍न व खर्चांवर आधारित कर्ज मिळण्‍यामध्‍ये मदत करू शकतात. तु़म्‍हाला किती कर्ज मंजूर होऊ शकते हे पाहण्‍यासाठी तुम्‍ही वैयक्तिक कर्ज पात्रता कॅल्‍क्‍युलेटरचा उपयोग करू शकता. त्‍याचप्रमाणे तुम्‍ही पर्सनल लोन कॅल्‍क्‍युलेटरचा (personal loan calculator) उपयोग करत योग्‍य कालावधी निवडू शकता आणि ईएमआयचे गणन करू शकता, जो तुमच्‍या फायनान्‍ससाठी योग्‍य असेल आणि तुमच्‍या निव्‍वळ व्‍याज परताव्‍यावर लक्ष देखील ठेवेल.

कर्जदात्‍याच्‍या पात्रता निकषांची पूर्तता करा

या दोन घटकांव्‍यतिरिक्‍त तुम्‍ही तुमच्‍या कर्जदात्‍याने निर्धारित केलेल्‍या वैयक्तिक कर्ज पात्रता निकषाची देखील पूर्तता केली पाहिजे. प्रत्‍येक कर्जदात्‍याचे स्‍वत:चे निकष असतात आणि हे निकष माहित असल्‍यास तुमचा अर्ज मंजूर न होण्‍याची शक्‍यता कमी होईल. उदाहरणार्थ, कर्जदाते वयोमर्यादा निश्चित करू शकतात. ज्‍यामुळे कर्जदात्‍यांकडून विशिष्‍ट वयोमर्यादेपर्यंत काम करणा-या कर्जदारांना कर्ज देण्‍यासंदर्भात खबरदारी घेतील जाते. 

बजाज फिनसर्व्‍ह सारख्‍या एनबीएफसी सोप्‍या वैयक्तिक कर्ज पात्रता अटींवर फायनान्‍स देतात. खाली काही निकष दिले आहेत, जे तुम्‍ही बजाज फिनसर्व्‍ह पसर्नल लोन घेताना पूर्ण करणे आवश्‍यक आहेत.

  • तुम्‍ही भारताचे नागरिक असले पाहिजे.
  • तुमचे वय २३ ते ५५ वर्षांदरम्‍यान असावे.
  • तुम्‍ही एमएनसी, सार्वजनिक किंवा खाजगी कंपनीमध्‍ये काम करणारे पगारदार व्‍यक्‍ती असले पाहिजे.
  • तुमचा सिबिल स्‍कोअर ७५० किंवा त्‍यापेक्षा अधिक असला पाहिजे.
  • तुमचे शहरानुसार किमान मासिक उत्‍पन्‍न असले पाहिजे.

या सर्व अटी पूर्ण केल्‍यानंतर पात्रतेचे सत्‍यापन करण्‍यासाठी काही आवश्‍यक कागदपत्रे गोळा करा आणि त्‍वरित वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करा. 

वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्‍यापूर्वी उच्‍च क्रेडिट स्‍कोअर असणे, कमी कर्ज-ते-उत्‍पन्‍न प्रमाण असणे आणि कर्जदात्‍याच्‍या पात्रता निकषांची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे. यामधून तुमचा अर्ज नामंजूर न होण्‍याची खात्री मिळते.

तुम्‍ही बजाज फिनसर्व्‍हमधून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना तुम्‍हाला २५ लाख रूपयांपर्यंत कर्ज मंजूर होऊ शकते. तसेच, कर्ज मंजूर झाल्‍यानंतर फक्‍त २४ तासांमध्‍ये कर्ज रक्‍कम तुमच्‍या खात्‍यामध्‍ये जमा होते. बजाज फिनसर्व्‍ह आकर्षक व्‍याजदरामध्‍ये आणि जवळपास ६० महिन्‍यांपर्यंतच्‍या लवचिक मुदतीपर्यत अर्थसाह्य करते. झटपट कर्ज मिळण्‍यासाठी आजच ऑनलाइन वैयक्तिक कर्जाचा अर्ज भरा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com