Investment Plan : मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी 'या' 8 योजनांमध्ये करा गुंतवणूक

प्रत्येक पालकाला आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्याची काळजी असते.
child investment
child investment sakal

तुम्हाला तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर, बाजारात अनेक वेगवेगळ्या कंपन्या उपलब्ध आहेत. तुमची मुले उद्याचे भविष्य आहेत. प्रत्येक पालकाला आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्याची काळजी असते. परंतु केवळ अशी इच्छा बाळगून तुम्ही तुमच्या मुलाला चांगले भविष्य देऊ शकत नाही. त्यासाठी आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीचा समतोल दृष्टिकोन अंगीकारणे आवश्यक आहे.

गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय आहे

जर तुम्ही वयाच्या 2 वर्षापासून म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले आणि 12 टक्के परतावा मिळत असेल तर तुम्हाला या रकमेसाठी दरमहा सुमारे 5,100 रुपये गुंतवावे लागतील. जर तुम्ही वयाच्या 8 व्या वर्षापासून गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला दरमहा सुमारे 11,271 रुपये गुंतवावे लागतील, तर तुम्ही वयाच्या 12 व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला दरमहा 20,805 रुपये गुंतवावे लागतील. त्यामुळे मुलांच्या सुखी भवितव्यासाठी त्याच्या जन्मानंतर लवकरात लवकर सुरुवात करावी. यामुळे तुमच्या बजेटवर जास्त भार पडत नाही आणि पैशाचे नियोजन करणे देखील सोपे होईल.

हेही वाचा : मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी 'हे' पर्याय निवडा

1) म्युच्युअल फंड: तुम्ही म्युच्युअल फंडात दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. तुम्ही SIP द्वारे थोड्या प्रमाणात गुंतवणूक सुरू करू शकता. दीर्घ मुदतीसाठी तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर 12 ते 15% परतावा सहज मिळवू शकता.

2) युनिट लिंक्ड विमा योजना (युलिप): तुम्ही मुलांसाठी युनिट लिंक्ड विमा योजना देखील निवडू शकता. बाजाराचा विचार करता, ULIP चा सरासरी परतावा 12-15% असतो.

3) FDs, NSCs आणि PPF: तुम्ही FDs, NSCs आणि PPF सारख्या पारंपारिक योजनांमध्ये मुलांच्या नावावर दीर्घ मुदतीसाठी कोणतीही जोखीम न घेता गुंतवणूक करू शकता.  या गुंतवणुकीतून तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य घडवू शकता.

4) चाइल्ड कॅपिटल गॅरंटी सोल्यूशन: हे युनिट लिंक्ड आणि गॅरंटीड रिटर्न प्लॅनचे संयोजन आहेत. या योजनांमध्ये, गुंतवलेल्या रकमेपैकी 50 ते 60% हमी परताव्याच्या स्वरुपात जाते. गुंतवणुकीचा हाही एक उत्तम मार्ग आहे.

child investment
17 हजारांच्या गुंतवणुकीचे झाले 1 कोटी, पण आता शेअर्समध्ये घसरणीचा तज्ज्ञांचा अंदाज...

5) बालशिक्षण योजना: भारतातील बालशिक्षण योजना हा एक प्रकारचा विमा आहे. हा विमा तुमच्या मुलाचे भविष्य सुनिश्चित करताना तुमच्या बचतीचे देखील संरक्षण करतो. ही योजना तुम्हाला तुमची बचत गुंतवू आणि नंतर तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी वापरू देते.

6) पोस्ट ऑफिस आरडी स्कीम: जर तुम्ही लहान मुलांसाठी शॉर्ट टर्म गुंतवणूक योजना शोधत असाल तर पोस्ट ऑफिस आरडी स्कीम हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. या योजनेत तुम्ही दरमहा १०० रुपयांची छोटी गुंतवणूक करून मोठा निधी उभारू शकता.

7) सुकन्या समृद्धी योजना: मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही एक उत्तम योजना आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर 250 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

8) एलआयसी न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन: एलआयसी न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन एलआयसी न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅनची ​​पॉलिसी टर्म 25 वर्षे आहे. यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीची रक्कम हप्त्यांमध्ये मिळते. या अंतर्गत, तुमचे मूल 18 वर्षांचे झाल्यावर प्रथम पैसे दिले जातात.

child investment
WPI Inflation : महागाईपासून सामान्यांना दिलासा; 'या' क्षेत्रांना होणार फायदा

चाइल्ड प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी महत्त्वाची माहिती

तुम्हाला तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर बाजारात अनेक वेगवेगळ्या कंपन्या उपलब्ध आहेत. तरीही चाइल्ड प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही माहिती समजून घेणे आवश्यक आहे. चाइल्ड प्लॅन निवडण्यापूर्वी, तुमचे उत्पन्न आणि बचत क्षमता निश्चितपणे मोजा. मग तुम्ही घेत असलेल्या चाइल्ड प्लॅनमध्ये तुमच्या मुलाची भविष्यातील गरज पूर्ण करण्यास सक्षम आहे का ते पहा.

तुम्ही आयकर सवलतीचाही लाभ घेऊ शकता

मुलांच्या नावावर एकापेक्षा जास्त चाइल्ड प्लॅन घेऊन तुम्ही आयकर कलम 80C अंतर्गत सूट मिळवू शकता. याशिवाय प्राप्त झालेल्या रकमेवर आयकर कलम 10(10D) अंतर्गत आयकरातून सूट मिळते. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त मुले असतील तर तुम्ही अशा योजनांमध्ये गुंतवणुक करू शकता. ज्यामध्ये दोन्ही मुलांसाठी पैसे वाचवता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com