वाहन कंपन्यांसाठी चीनची कवाडे खुली 

पीटीआय
बुधवार, 18 एप्रिल 2018

बीजिंग - पुढील पाच वर्षांत वाहननिर्मिती क्षेत्रातील विदेशी कंपन्यांना पूर्ण मालकीचे अधिकार देण्याची घोषणा चीनने मंगळवारी केली. सध्या चीनमध्ये विदेशी वाहन कंपन्यांना सरकारी कंपन्यांसोबत भागीदारी करणे बंधनकारक आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्यापारावरून सुरू असलेला वाद आणि अन्य भागीदार देशांसोबत व्यापारातील तणाव या पार्श्‍वभूमीवर चीनने हा निर्णय घेतला आहे. सध्या जागतिक वाहन कंपन्या स्थानिक सरकारी कंपन्यांसोबत भागीदारी करून चीनमध्ये व्यवसाय करतात. या नियमांममुळे भविष्यात प्रतिस्पर्धी बनू शकणाऱ्या स्थानिक कंपन्यांसोबत जागतिक कंपन्यांना तंत्रज्ञानासह अन्य बाबींची देवाणघेवाण करावी लागते. चीनने आता विदेशी कंपन्यांना पुढील पाच वर्षांत पूर्ण मालकीचे अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: China announced its full rights to foreign companies in the manufacturing sector