esakal | अनिल अंबानींकडून सगळे पैसे वसूल करणार; चिनी बँकांचं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

anil ambani

22 मे 2020 ला ब्रिटनमधील न्यायलयाने भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे प्रमुख अनिल अंबानी (Anil Ambani) यांना तीन चिनी बँकाकडून घेतलेले कर्ज देण्याचे आदेश दिले होते

अनिल अंबानींकडून सगळे पैसे वसूल करणार; चिनी बँकांचं स्पष्टीकरण

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली : 22 मे 2020 ला ब्रिटनमधील न्यायलयाने भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे प्रमुख अनिल अंबानी (Anil Ambani) यांना तीन चिनी बँकाकडून घेतलेले कर्ज देण्याचे आदेश दिले होते. यासाठी न्यायालयाने 12 जून 2020 पर्यंतची मुदत दिली होती. अनिल अंबानी यांनी चीनच्या इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना आणि चायना डेव्हलपमेंट बँक तिन्ही बँकांचे मिळून जवळपास 5 हजार 281 कोटी कर्ज घेतले होते. आतापर्यंत अनिल अंबानी कर्जाची परतफेड करू न शकल्यानं तीन चिनी बँका आक्रमक झाल्या आहेत. या बँकांनी म्हटलंय की, अनिल अंबानी यांच्याकडून कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी आम्ही सर्व कायदेशीर मार्गांचा पाठपुरावा करणार आहोत.  

इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना (Industrial and Commercial Bank of China)एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना (Export-Import Bank of China) आणि चायना डेव्हलपमेंट बँक (China Development Bank ) या तीन चिनी बँकांनी लंडनमधील कोर्टाला कळवून मागणी केली आहे. या बॅंकां आता अनिल अंबानी यांच्याकडून कर्ज वसूलीसाठी सर्व कायदेशीर मार्गाचा वापर करणार आहेत. 

वाचा सविस्तर- चीनसह पूर्व आशियातील देशांच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचा संसर्ग

यापुर्वी 15 जून रोजी इंडस्ट्रिअल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायनाच्या नेतृत्वाखाली चिनी बँकांनी अनिल अंबानी यांच्या मालमत्तेची माहिती देण्याची मागणी केली होती. शुक्रवारी एडीजी ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी लंडनच्या न्यायालयात, आपला खर्च खूप कमी असून, सध्याचा खर्च पत्नी टिना अंबानी करत असल्याचं सांगितलं होतं.' शुक्रवारच्या न्यायालयीन सुनावणीनंतर चिनी बँकांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, बँका त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना अंबानी यांना दिलेल्या कर्जांची वसूली करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व कायदेशीर मार्गांचा पाठपुरावा करण्यासाठी उलटतपासणीतून मिळालेल्या माहितीचा वापर करतील. 

 देशात 1 ऑक्टोबरपासून नवे नियम; बेकरी पदार्थ,वाहतूक नियम ते विमा पॉलिसीत होणार बदल

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (mukesh ambani) हे अनिल अंबानी यांचे मोठे बंधू आहेत.  शुक्रवारी ब्रिटनमधील कोर्टाला अनिल अंबानी यांनी सांगितले की, ते एक साधे व्यक्ती असून त्यांच्याकडे एकच गाडी आहे. तसेच त्यांनी त्यांच्या जवळ असणारे सर्व दागिणे जानेवारी ते जून 2020 दरम्यान विकले होते, त्यातून त्यांना 9.9 कोटी रुपये मिळाले होते. गाड्यांच्या ताफ्याबद्दल विचारले असता अंबानी यांनी या सर्व सोशल मिडियावरील अफवा असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे रोल्स रॉईस कधीच नव्हती, असे टाइम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालात म्हटले होते.

(edited by- pramod sarawale)