नोटाबंदीमुळे 40% घटली सिगारेटची विक्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर सिगारेटच्या विक्रीत तब्बल 40 टक्के घसरण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे या निर्णयाचा फटका सिगारेट कंपन्यांनादेखील बसला आहे. 

सिगारेटच्या पाकिटावर वैधानिक इशारा दिलेला असतो, त्याचा सिगारेटच्या विक्रीवर काहीही परिणाम झालेला नाही. मात्र पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा रद्द केल्यामुळे मात्र विक्रीत घसरण झाली आहे. शहरातील सिगारेटची विक्री करणार्‍या विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबरनंतर सुट्या सिगारेटच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. नेहमीचे ग्राहकदेखील कमी झाले असून सिगारेट खरेदी करणे टाळत आहेत.

रोख खरेदीवर बंधने आल्याने शहरी भागात सिगारेट विक्रेते 'पेटीएम'चा वापर करीत आहेत. याशिवाय काही विक्रेते क्रेडिट आणि डेबिट कार्डचा स्वीकार करून खरेदी-विक्री करत आहे. मात्र ग्रामीण भागातील विक्रेत्यांना याचा मोठा फटका बसला आहे. येत्या तिमाहीत आयटीसी, गॉडफ्रे फिलिप्स इंडिया आणि व्हीएसटी इंडस्ट्रीज या सिगारेट निर्मात्या कंपन्यांच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 
 
Web Title: cigarette sale declines by 40% after note ban