esakal | City Bank भारतातील गाशा गुंडाळणार, काय आहे कारण ?
sakal

बोलून बातमी शोधा

सिटी बँक

City Bank भारतातील गाशा गुंडाळणार? काय आहे कारण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली- अमेरिकेतील प्रमुख बँक सिटी बँकेने (City Bank) भारतातील आपला व्यवसाय बंद करण्याची तयारी सुरु केली आहे. बँक आपला कंझ्युमर बँकिंग बिझनेस बंद करणार असल्याचे गुरुवारी सांगण्यात आले आहे. हा त्यांच्या जागतिक रणनीतीचा भाग असल्याचे बँकेने म्हटले आहे. बँकेच्या कंझ्युमर बँकिंग बिझनेसमध्ये क्रेडिट कार्ड्स, रिटेल बँकिंग, होम लोन आणि वेल्थ मॅनेजमेंटचा समावेश आहे. सिटी बँकेच्या देशात 35 शाखा आहेत आणि त्यांच्या कंझ्युमर बँकिंग बिझनेसमध्ये सुमारे 4 हजारांहून अधिक जण काम करतात.

सिटी बँक 13 देशातील कंझ्युमर बँकिंग बिझनेस बंद करत आहे. या देशांमध्ये चांगल्या स्पर्धेचे वातावरण नाही, असे मत बँकेचे ग्लोबल सीईओ जेन फ्रेझर यांनी व्यक्त केले आहे. परंतु, याबाबत विस्तृत माहिती समजू शकलेली नाही. पण कंझ्युमर बँकिंग बिझनेसमधून बाहेर पडण्यासाठी नियामकीय मंजुरीही गरजेची असेल.

हेही वाचा: राज ठाकरेंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

सिटी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशु खुल्लर म्हणाले की, आमच्या ऑपरेशन्समध्ये त्वरीत कोणताच बदल होणार नाही. या घोषणेमुळे आमच्या सहकाऱ्यांवर लगेच कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही आमच्या ग्राहकांप्रती सेवा भाव कायम ठेवणार आहोत. या घोषणेमुळे बँकेची सेवा आणखी मजबूत होईल. संस्थागत बँकिंग व्यवसायाशिवाय सिटी आपल्या मुंबई, पुणे, बंगळुरु, चेन्नई आणि गुरुग्राम केंद्रांतून जागतिक व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार आहे. सिटी बँकेला आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 4912 कोटी रुपयांचा शुद्ध नफा झाला होता. जो यापूर्वीच्या आर्थिक वर्षात 4185 कोटी रुपये होता. सिटी बँकेने 1902 मध्ये भारतात व्यवसाय सुरु केला होता आणि 1985 मध्ये बँकेने कंझ्युमर बँकिंग बिझनेस सुरु केला होता.

हेही वाचा: CBIच्या माजी प्रमुखांचा कोरोनामुळे मृत्यू; दिग्विजय सिंह, सुरजेवालाही बाधित

भागीदारीच्या शोधात सिटी बँक

सिटी बँक आपल्या नव्या व्यवसायाच्या रणनीतीनुसार भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, बहारिन, चीन, दक्षिण कोरिया, मलेशिया, फिलीपिन्स, पोलंड, रशिया, तैवान, थायलंड आणि व्हिएतनाममधील रिटेल बँकिंग बिझनेस बंद करणार आहे. परंतु, त्यांचा होलसेल बिझनेस सुरुच राहील. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार सिटी बँक भारतात आपल्या रिटेल आणि कंझ्युमर बिझनेस विकण्यासाठी खरेदीदाराचा शोध घेत आहे.

loading image
go to top