CBIच्या माजी प्रमुखांचा कोरोनामुळे मृत्यू; दिग्विजय सिंह, सुरजेवालाही बाधित

बिहार केडरच्या 1974 च्या बॅचचे अधिकारी राहिलेल्या सिन्हा यांनी भारत-तिबेट सीमा पोलिस दल (आयटीबीपी) तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे नेतृत्त्व केले होते.
रंजीत सिन्हा
रंजीत सिन्हावृत्तसंस्था

नवी दिल्ली- देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. सलग दुसऱ्या दिवशीही 2 लाखांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच कोरोनाचा फटका बसत आहे. याचदरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) चे माजी संचालक रंजीत सिन्हा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. 68 वर्षीय सिन्हा यांनी सीबीआयच्या प्रमुख पदासह केंद्राच्या अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, प्रवक्ते रणदिप सुरजेवाला तसेच शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या तथा माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

अनेक महत्त्वाच्या पदांवर केले काम

बिहार केडरच्या 1974 च्या बॅचचे अधिकारी राहिलेल्या सिन्हा यांनी भारत-तिबेट सीमा पोलिस दल (आयटीबीपी) तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे नेतृत्त्व केले होते. 2012 मध्ये ते सीबीआयचे प्रमुख होण्याआधी पाटणा आणि दिल्लीत सीबीआयमध्ये अनेक मोठ्या पदांची जबाबदारी पार पाडली होती. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार सिन्हा यांना गुरुवारी रात्री कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते.

दिग्गज नेतेही बाधित

कोरोना विषाणूच्या तडाख्यात काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार दिग्विजय सिंह आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदिप सुरजेवाला हेही सापडले आहेत. दिग्विजय सिंह यांनी टि्वट करत ही माहिती दिली. ते म्हणाले की, माझी कोविड तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी माझ्या दिल्लीतील निवासस्थानी क्वारंटाइन आहे. कृपया या कालावधीत माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःला आयसोलेट करावे आणि योग्य ती खबरदारी घ्यावी.

रंजीत सिन्हा
कोरोनाचा प्रकोप : वेळेआधीच कुंभमेळा आटोपणार ?

हरसिमरत कौर यांनाही कोरोनाची लागण

शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि खासदार हरसिमरत कौर बादल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनीही टि्वट करुन याची माहिती दिली. हरसिमरत कौर यांनी म्हटले की, हलक्या लक्षणांसह माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतःला क्वारंटाइ केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी आणि स्वतःला आयसोलेट करावे.

रंजीत सिन्हा
बापरे! सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांनी ओलांडला २ लाखाचा आकडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com