esakal | केंद्र सरकारचा मोठा झटका, CNG सह पाईप गॅसही महागणार
sakal

बोलून बातमी शोधा

CNG

केंद्र सरकारचा मोठा झटका, CNG सह पाईप गॅसही महागणार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारने पुन्हा एकदा महागाईचा झटका दिला आहे. नैसर्गिक वायूंच्या किंमतीत (natural gas prices) ६२ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएनजी (CNG) आणि प्रमुख शहरांमध्ये घरगुती वापरासाठी पुरवठा केल्या जाणाऱ्या पाईप गॅसच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: ऑक्टोबरमध्ये गॅस दराचा भडका; जाणून घ्या किंमत

केंद्र सरकारने गुरुवारी नैसर्गिक वायू (NG) च्या किंमतीत 62 टक्के वाढ केली आहे. या गॅसचा वापर खत, वीजनिर्मिती, सीएनजीच्या स्वरूपात वाहन इंधन आणि स्वयंपाकासाठी गॅस म्हणून केला जातो. दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये सीएनजी आणि पाईप केलेल्या स्वयंपाकाच्या गॅसचे दर 10-11 टक्के वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल 2019 नंतर किमतीतील ही पहिली वाढ आहे. प्रमाण मानल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढल्याने गॅसचे दर वाढले आहेत. वीजेचे दर देखील महागण्याची शक्यता आहे. मात्र, आपल्याकडे वायूपासून वीजनिर्मिती अगदी कमी प्रमाणात केली जाते. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसणार नाही. एप्रिल 2019 नंतरच्या दरांमध्ये झालेली ही पहिलीच वाढ आहे

सार्वजनिक क्षेत्रात ओएनजीसी आणि ऑइल इंडिया या दोन कंपन्यांना नैसर्गिक वायूसाठी २.९० डॉलर प्रती दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट असा दर निश्चित करण्यात आला आहे. पुढील सहा महिन्यांसाठी हा दर निश्चित करण्यात आला असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनलेसिस सेल या विभागाने म्हटलं आहे.

loading image
go to top