कोल इंडियाच्या नफ्यात 77 टक्के घसरण

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडियाला सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत 600 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. विक्रीत घसरण आणि खर्चातील वाढीमुळे कंपनीच्या नफ्यात तब्बल 77 टक्क्यांची घट झाली आहे. काल(मंगळवार) जाहीर झालेल्या तिमाही निकालांनंतर आज कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे 3 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत कंपनीला सुमारे 2,654 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

जुलै ते सप्टेंबरदरम्यान कंपनीचे निव्वळ कार्यान्वयन उत्पन्न 17,489.8 कोटी रुपयांवरुन 16,212.5 कोटी रुपयांवर पोचले आहे. या काळात कंपनीची एकुण विक्री 8 टक्क्यांनी घसरुन 15,645 कोटी रुपयांवर पोचली आहे. त्याचप्रमाणे, कंपनीचा एकुण खर्च गेल्यावर्षीच्या तुलनेत 14,733 कोटी रुपयांवरुन 16,161.9 कोटी रुपयांवर पोचला आहे.

मुंबई शेअर बाजारात कोल इंडियाचा शेअर सध्या(बुधवार, 10 वाजून 5 मिनिटे) 296.95 रुपयांवर व्यवहार करत असून 2.88 टक्क्यांनी घसरला आहे.

Web Title: Coal India net profit plunges 77% in September quarter