'या' सॉफ्टवेअर कंपनीत होणार मेगाभरती; 'पॅकेज'मध्ये 18 टक्क्यांची वाढ

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

यावर्षी अभियांत्रिकीच्या पदवीधरांची निवड करताना 'पॅकेज'मध्ये  18 टक्क्यांची वाढ देखील केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यास किमान 4 लाखांचे वार्षिक वेतन मिळणार आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची 'कॉग्निझंट टेक्नॉलॉजिस सोल्युशन्स लिमिटेड' चालू वर्षात तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कॉलेज कॅम्पसच्या माध्यमातून 2020 मध्ये अभियांत्रिकी आणि विज्ञान पदवीधर विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Delhi Elections : उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांची व्हिक्टरी; जंगी मिरवणूक

वर्तमान स्थितीत कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडणारी मुले डिजिटल तंत्रज्ञानाची जाण असलेली आहेत. अशा विद्यार्थ्यांची निवड करण्याचे कंपनीचे धोरण असल्याचे कॉग्निझंटने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ब्रायन हम्फ्रीज यांनी मिंट या इंग्रजी वुत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. तसेच यावर्षी अभियांत्रिकीच्या पदवीधरांची निवड करताना 'पॅकेज'मध्ये  18 टक्क्यांची वाढ देखील केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यास किमान 4 लाखांचे वार्षिक वेतन मिळणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात कॉग्निझंट 2 लाख कर्मचारी असणारी देशातील दुसरी आयटी कंपनी बनली होती. या यादीत टीसीएस आघाडीवर आहे. तर इन्फोसिस तिसऱ्या क्रमांकावर आहे. कॉग्निझंटचे मुख्यालय अमेरिकेत आहे. त्यामुळे ती देशातील सर्वाधिक कर्मचारी असणारी एमएनसी कंपनी बनली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cognizant technologies have 20 thousand vacancies