esakal | Delhi Elections : उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांची व्हिक्टरी; जंगी मिरवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

AAP candidate Manish Sisodia wins against BJP candidate in Delhi Elections

खुशखबर म्हणजे पतपरगंज विधानसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ३००० मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. 

Delhi Elections : उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांची व्हिक्टरी; जंगी मिरवणूक

sakal_logo
By
वृत्तसंस्था

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली : दिल्लीवर पुन्हा एकदा आपचा करिष्मा दिसला. दिल्लीतील ७० विधानसभा मतदारसंघांपैकी ६० जागांवर आघाडी मिळवण्यात आपला यथ आले असून, दिल्लीत पुन्हा एकदा आपचे सरकार स्थापन होऊन अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाची हॅटट्रीक करतील. अशातच खुशखबर म्हणजे पतपरगंज विधानसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ३००० मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. 

धमाल सेलिब्रेशन! पत्नीचा वाढदिवस अन् केजरीवालांची हॅटट्रीक!

पतपरगंज विधानसभा मतदारसंघात आपचे मनिष सिसोदिया व भाजपचे रवी नेगी हे रिंगणात होते. सकाळच्या टप्प्यात सिसोदियांनी आघाडी घेतली, मात्र मधल्या काळात भराच वेळासाठी नेगी यांनी बाजी मारत त्यांना पिछाडीवर ठेवले होते. अखेरील सिसोदिया यांनी पुन्हा एकदा आघाडीत घेत तब्बल ३००० मतांनी विजय मिळवला  आहे. यानंतर सिसोदिया यांनी विजय साजरा करण्यासाठी जंगी मिरवणूक काढली. 

केजरीवालांच्या घरी आज 'डबल सेलिब्रेशन'; हे आहे दुसरं खास कारण!

माध्यमांशी बोलताना सिसोदियआ म्हणाले की 'पतपरगंज विधानसभा मतदारसंघाचा पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आल्याने मी खूप खुश आहे. भाजपने पुन्हा एकदा द्वेषाचं राजकारण केलं, मात्र दिल्लीकरांनी विकास कामे करणाऱ्यांनाच निवडून दिले.' अशी प्रतिक्रीया सिसोदिया यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपच्या सरकारमध्ये मनिष सिसोदियांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. आप सरकारच्या प्रशासनामधील आधारस्तंभ म्हणून मनिष सिसोदिया यांच्याकडे बघितले जाते. तसेच, केजरीवालांसाठी विश्वासू नेत्यांमध्ये सिसोदियांचे नाव प्रथम घेण्यात येते. त्यामुळे त्यांच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागून होते.