कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवायला 'या' कंपनीने घेतला वेतनवाढीचा निर्णय

Asian-Paints
Asian-Paints

कोरोना विषाणूने घातलेल्या धुमाकुळानें संपूर्ण जग ठप्प झाले आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था ठप्प झाल्या आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांपासून ते अगदी छोटे उद्योग यात भरडले गेले आहेत. परिणामी अनेक लोकांना नोकरी आणि वेतन कपातीचा सामना करावा लागला आहे. परिणामी सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची आर्थिक गणिते तर कोलमडली आहेतच पण त्यांना नैराश्येने देखील ग्रासले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि अधिक जोमाने काम करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून देशातील आघाडीची पेंट्स उत्पादक कंपनी 'एशियन पेंट्स'ने कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याबरोबरच कंपनीने आपल्या सेल्स विभागातील कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालयाचा खर्च, विमा कवच अशा सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पेंट्स विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये म्हणजेच पार्टनर स्टोअर्समध्ये स्वच्छेतेचे पालन व्हावे यासाठी स्वच्छतेच्या सर्व साधनांची उपलब्धता व्हावी याकडे देखील कंपनी लक्ष देणार आहे.  महत्त्वाचे म्हणजे कंपनीने कॉन्टॅक्टर्सच्या खात्यांवर ४० कोटी रुपये जमा केले आहेत.

“कर्मचाऱ्यांबरोबर संवाद साधण्याची आणि कठीण प्रसंगात आपण सर्वजण एक आहोत हे सांगण्याची ही एक उत्तम संधी असल्याचे मला वाटते. एक विश्वासार्ह आणि प्रगल्भ ब्रँड म्हणून कर्मचाऱ्यांना विश्वास देणे महत्त्वाचे आहे. केवळ नोकर भरती करा आणि काम झाले की किंवा संकट आले की त्यांना कामावरुन काढू टाका हे आमचे धोरण नाही, " असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी असणाऱ्या अमित सिंघल यांनी म्हटले आहे. तसेच आमची कंपनी कर्जमुक्त असून पुढील काही महिने अशीच परिस्थिती कायम राहिली तरी त्यावर मात करण्याचा आणि पुन्हा भरारी घेण्याची क्षमता आमच्यात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे कंपनीने मार्च महिन्यात शेअरधारकांना घसघशीत लाभांश जाहीर केला होता.

या अगोदर देखील कंपनीने पीएम केअर फंडात ३५ कोटींची मदत जमा केली आहे. तसेच कंपनीने सॅनिटायझरचे उत्पादन घेण्यास देखील सुरुवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com