बार्कलेज बॅंकेला ग्राहक मंचाचा दणका

पीटीआय
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

ग्राहकाला पाच हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश 
नवी दिल्ली - व्यापाराच्या अयोग्य पद्धतींचा वापर केल्याबद्दल ग्राहकाला पाच हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक मंचाने बार्कलेज बॅंकेला दिला आहे. 

दक्षिण दिल्लीतील रहिवासी असलेले भागवत प्रसाद यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यांनी क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीपोटी एकरकमी दहा हजार रुपये भरले होते. मात्र, बार्कलेज बॅंकेने एकरकमी परतफेड न करता हप्त्यांमध्ये ते वळते केले. यामुळे त्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागला. याबाबत प्रसाद यांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. 

याप्रकरणी जिल्हा ग्राहक मंचाने म्हटले आहे की, बॅंकेने अयोग्य व्यापार पद्धतींचा अवलंब केला आहे. यामुळे ग्राहकाला त्रास दिल्याबद्दल आणि कायदेशीर खर्च म्हणून बॅंकेने त्यांना पाच हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी. बॅंकेने एकरकमी दहा हजार रुपयांची परतफेड करणे अपेक्षित होते. मात्र, बॅंकेने या पैशातून दहा मासिक हप्ते वळते केले आणि उरलेल्या दोन हप्त्यांसाठी ग्राहकाला नोटिसा पाठविल्या. तसेच, या दोन हप्त्यांवर विलंब शुल्क भरण्यास सांगितले. बॅंकेने कोणतीही खातरजमा न करता पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने काम केलेले दिसत आहे.

Web Title: Consumer Forum bump by Barclays Bank