ग्राहकांची ‘भीम’ला पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhim

ग्राहकांची ‘भीम’ला पसंती

नवी दिल्ली : भारतात ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा परिणाम म्हणून भारत इंटरफेस फॉर मनी- युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात भीम-यूपीआय भारतीय ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले आहे. भीम-यूपीआयने ४५२.७५ कोटी डिजिटल पेमेंट केल्याचा विक्रम नोंदवला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही माहिती दिली.

इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात २८ फेब्रुवारीपर्यंत ८.२७ लाख कोटी रुपयांचे व्यवहार भीम-यूपीआयद्वारे करण्यात आले आहेत. मंत्रालयाने सांगितले, की आर्थिक क्षेत्र आणि अर्थव्यवस्थेला डिजिटल बनवण्यासाठी भारत सरकारच्या धोरणाचा एक भाग म्हणून केलेल्या प्रयत्नांमुळे मागील काही वर्षांत डिजिटल व्यवहारात वाढ होत आहे.

मागील चार वर्षांत डिजिटल व्यवहार वाढले आहेत. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये १३४ कोटी होते, ते कैक पट वाढून आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये पाच हजार ५५४ कोटी रुपये झाले आहे. चालू आर्थिक वर्षात २८ फेब्रुवारीपर्यंत एकूण सात हजार ४२२ कोटी डिजिटल व्यवहारांची नोंद करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने नोंदवले आहे, की भारत सरकार आणि आरबीआयने डिजिटल व्यवहारांना सुरक्षित करण्यासाठी बरीच महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत.डिजिटल व्यवहारासाठी प्रमुख सुरक्षा उपायांमध्ये मल्टी फॅक्टर प्रमाणीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. या मल्टिफॅक्टर प्रमाणीकरणाचा मूळ उद्देश व्यवहारांची गोपनीय माहिती सुरक्षित ठेवणे.

तक्रार निवारण करण्याचे प्रयत्न

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माहितीनुसार नागरिकांच्या सायबर हल्ले, फसवणूक यासंबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी सरकार आणि आरबीआयद्वारे एक सर्वोत्तम तक्रार निवारण तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. ज्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींचे सहज निवारण होईल.

Web Title: Consumers Like Bhim 452 Crore Digital Payment Record

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top