कोरोनाचा दणका ॲमेझॉन कंपनीलाही; शेअर्समध्ये घसरण 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

ॲमेझॉन कंपनी पाच वर्षांत पहिल्यांदाच तिमाही निकालात तोटा नोंदवण्याची शक्यता आहे. कंपनीच्या महसूलाता वाढ झालेली असतानाही कोविड-१९ महामारीला तोंड देण्यासंदर्भातील खर्च केलेल्या ४ अब्ज डॉलरचा परिणाम कंपनीच्या ताळेबंदावर झाला आहे. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या कोविड-१९ साठीच्या टेस्ट करण्याचेही नियोजन करते आहे. त्या खर्चाचाही यात समावेश असणार आहे. ॲमेझॉन ही जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे. ॲमेझॉनच्या शेअरच्या किंमतीत ५ टक्क्यांची घसरण झाली आहे.

Coronavirus - ॲमेझॉन कंपनी पाच वर्षांत पहिल्यांदाच तिमाही निकालात तोटा नोंदवण्याची शक्यता आहे. कंपनीच्या महसूलाता वाढ झालेली असतानाही कोविड-१९ महामारीला तोंड देण्यासंदर्भातील खर्च केलेल्या ४ अब्ज डॉलरचा परिणाम कंपनीच्या ताळेबंदावर झाला आहे. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या कोविड-१९ साठीच्या टेस्ट करण्याचेही नियोजन करते आहे. त्या खर्चाचाही यात समावेश असणार आहे. ॲमेझॉन ही जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे. ॲमेझॉनच्या शेअरच्या किंमतीत ५ टक्क्यांची घसरण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

छोटा विचार नाही
'आम्ही छोटा विचार करत नाही आहोत', असे मत ॲमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या जेफ बेझॉस यांनी व्यक्त केले आहे. कोविड-१९च्या महामारीच्या काळातसुद्धा ॲमेझॉन मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार असल्याचेच हे संकेत समजले जात आहेत. सद्यस्थितीत ॲमेझॉनच्या प्रतिस्पर्धी व्यावसायिकांना, रिटेल व्यावसायिकांना आपले स्टोअर बंद करावे लागत असताना अॅमेझॉनने मात्र १,७५,००० कर्मचाऱ्यांची भरती केली आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

'ॲमेझॉनने सुरूवातीच्या टप्प्यात नफा कमावण्यास सुरूवात करण्याआधी आपल्याकडील रोकड गुंतवून कंपनीची बाजारातील स्थिती भक्कम केली आहे. तेच धोरण अवलंबत लॉकडाऊनच्या काळातसुद्धा कंपनी गुंतवणूक करते आहे आणि यातून ती विनर म्हणून पुढे येईल', असे मत अमेरिकन बाजाराचे विश्लेषक किम खान यांनी व्यक्त केले आहे. सध्या पूर्ण लॉकडाऊन सुरू असताना या तिमाहीत ॲमेझॉनच्या उत्पन्नात २८ टक्क्यांची वाढ होत कंपनीचा महसूल ८१ अब्ज डॉलरवर पोचण्याची शक्यता कंपनीने वर्तवली आहे. सर्वसाधारण परिस्थितीत चालू तिमाहीत ॲमेझॉन ४ अब्ज डॉलरचा कार्यान्वित नफा कमावू शकेल. मात्र कंपनी कोविड-१९ च्या संदर्भात करत असलेल्या खर्चामुळे कंपनीच्या एकूणच खर्चात वाढ होण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे. कंपनीचे कार्यान्वित उत्पन्न हे १.५ अब्ज डॉलरचा तोटा ते १.५ अब्ज डॉलरचा नफा या रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे. मागील वर्षी याच कालावधीत ॲमेझॉनने ३.१ अब्ज डॉलरचे उत्पन्न कमावले होते.

लॉकडाऊननं मोडलं ऍटोमोबाईल क्षेत्राचं कंबरडं; बड्या कंपनीची एकही गाडी विकली नाही 

संकटात संधी शोधणारी कंपनी

  • ॲमेझॉन मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत
  • ॲमेझॉनचा महसूल वाढूनही तोटा होण्याची शक्यता
  • कोविड-१९ महामारीत जेफ बेझॉसच्या संपत्तीत ५ अब्ज डॉलरची वाढ
  • जगभरातील संकटकाळात ॲमेझॉनने ठोकली मांड

कोठे वाढला खर्च? 
ॲमेझॉनने मागील काळात क्लाऊड डेटा सेंटर्स, ॲमेझॉन व्हिडिओ आणि व्हॉईस कंट्रोल गॅजेट्स यांच्यावर प्रचंड खर्च केला आहे. त्यातून कंपनीला खूप मोठा नवा व्यवसायदेखील मिळाला आहे. मागील महिन्यात जगभर घसरलेले शेअर बाजार लक्षात घेता आणि सध्याची ॲमेझॉनच्या शेअरमधील तात्पुरती घसरण लक्षात घेऊनही कंपनीच्या शेअरच्या किंमतीत फेब्रुवारीच्या मध्यापासून १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे जेफ बेझॉस यांच्या संपत्तीत ५ अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. त्याचबरोबर कोरोवा विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर कंपनी गुंतवणूक वाढवते आहे.

मात्र, त्याचबरोबर ॲमेझॉनला मनुष्यबळाच्या संदर्भातील अडचणींनाही सामोरे जावे लागते आहे. किमान डझनभर ठिकाणी तरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कोविड-१९चा संसर्ग झाला आहे. त्यामुळे काही कामगार संघटनांनी कामकाज बंद ठेवण्याचीही मागणी केली होती. ॲमेझॉनने अमेरिका आणि युरोपातील आपल्या वेअर हाऊसमध्ये मास्क आणि तापमान तपासणीची स्क्रिनिंगही केली आहे. सॉफ्टवेअरच्या मदतीने कंपनी कोविड-१९ संदर्भातील नियमांवर देखरेख करते आहे. याशिवाय कोविड-१९संदर्भात इतरही अनेक उपाययोजना करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus amazon company impact shares are down