लॉकडाऊनमध्येही 'या' कंपनीच्या निर्यातीत १०९ टक्के वाढ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

लॉकडाऊनमुळे देशभरातील बहुतांश उद्योग-व्यवसाय ठप्प झालेला असताना पोलाद आणि संबंधित उत्पादनांशी निगडित असलेल्या एका कंपनीच्या निर्यातीत दणदणीत वाढ झाली आहे. नवीन जिंदाल यांच्या जिंदाल स्टील अॅंड पॉवर लि.च्या (जेएसपीएल) निर्यातीत भरघोस वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर जिंदाल स्टीलने आतापर्यतची उच्चांकी निर्यात नोंदवली आहे. कंपनीने एप्रिल महिन्यात २.४८ लाख मेट्रिक टन पोलाद आणि संबंधित उत्पादनांची निर्यात केली आहे.

लॉकडाऊनमुळे देशभरातील बहुतांश उद्योग-व्यवसाय ठप्प झालेला असताना पोलाद आणि संबंधित उत्पादनांशी निगडित असलेल्या एका कंपनीच्या निर्यातीत दणदणीत वाढ झाली आहे. नवीन जिंदाल यांच्या जिंदाल स्टील अॅंड पॉवर लि.च्या (जेएसपीएल) निर्यातीत भरघोस वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर जिंदाल स्टीलने आतापर्यतची उच्चांकी निर्यात नोंदवली आहे. कंपनीने एप्रिल महिन्यात २.४८ लाख मेट्रिक टन पोलाद आणि संबंधित उत्पादनांची निर्यात केली आहे. मागील वर्षी याच कालावधीशी तुलना करता कंपनीच्या निर्यातीत तब्बल १०९ टक्क्यांची वाढ झाली आहे. जिंदाल स्टीलच्या एकूण विक्रीमध्ये निर्यातीचा वाटा ७४ टक्के इतका आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोविड-१९ चा भारतात प्रादूर्भाव होण्यास सुरूवात झाल्यानंतर त्याचा विविध घटकांवर विपरित परिणाम होण्यास सुरूवात झाली होती. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात देशभर लॉकडाऊनची सुरूवात झाली होती. मात्र, अशा संकट काळातसुद्दा जेएसपीएल इंडियाच्या उत्पादनात ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल २०२० मध्ये कंपनीने ५,५०,००० मेट्रिक टन पोलाद आणि ग्रॅन्युलेटेड पिग आयर्नचे उत्पादन केले आहे. एप्रिल महिन्यात तर कंपनीचे एकूण पोलाद उत्पादन ६,५५,००० मेट्रिक टनांवर पोचले आहे, अशी माहिती जिंदाल स्टीलने दिली आहे.

आयटी कर्मचाऱ्यांची भीती,  'पुढील सहा महिन्यात संकट होणार गहिरे'

कंपनीचे सर्व उत्पादन प्रकल्प गृह मंत्रालयाने दिलेल्या नियमांनुसार सुरू होते आणि उत्पादन प्रकल्पांमध्ये कामगारांमध्ये योग्य अंतर राखणे आणि कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठीचे निकष पाळले जात होते, असेही कंपनीने सांगितेल आहे. जेएसपीएलच्या अंगूल येथील ब्लास्ट फर्नेसमधून एप्रिल २०२० मध्ये २ लाख ९८ हजार मेट्रिक टन उच्चांकी पोलादाचे उत्पादन करण्यात आले आहे. या प्रकल्पातून रोज सरासरी १० हजार मेट्रिक टन उत्पादन करण्यात येते आहे. जेएसपीएलचे व्यवस्थापकीय संचालक व्ही आर शर्मा यांनी या कामगिरीचे श्रेय आपल्या सर्व टीमला दिले आहे.

'जेएसपीएलने योग्य पद्धतीने देशातील आणि परदेशातील मागणी ओळखून आपल्या उत्पादन प्रकल्पांमधील कामकाज सुरू ठेवले होते. भारतीय रेल्वे आणि देशाच्या पूर्व भागातील विविध बंदरांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे जेएसपीएल परदेश चलन कमावण्यासंदर्भात पोलादाचे उत्पादन करते आहे', असे मत शर्मा यांनी व्यक्त केले आहे. जेएसपीएलच्या ओमान येथील उत्पादन प्रकल्पाने एप्रिल महिन्यात १.०६ लाख मेट्रिक टन पोलादाचे उत्पादन केले आहे. जेएसपीएलने भारतीय रेल्वेसाठी आर २६० दर्जाची रेल विकसित केली आहे.

कंपनीची वाटचाल
जेएसपीएलने एप्रिलमध्ये नोंदवली निर्यातीत १०९ टक्के वाढ
२.४८ लाख मेट्रिक टन पोलादाची निर्मिती
एकूण विक्रीत निर्यातीचा वाटा ७४ टक्के
कंपनीने नोंदवली आतापर्यतची उच्चांकी निर्यात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus lock down jspl company export